वैष्णवीच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 05:00 AM2020-07-08T05:00:00+5:302020-07-08T05:00:15+5:30

गावातीलच शेख अलताप याने विवाहितेवर भरदिवसा चौकात चाकूने वार करीत तरुणीची हत्या केली. या घटनेचे गावासह देशात तीव्र पडसाद उमटले. या गंभीर बाबीची दखल घेत आरोपी शेख अलताप याला फाशीची शिक्षा होण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालवून या खटल्यात अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अन्यथा सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांच्या नेतृत्त्वात राज्यभर तीव्र आंदोलने करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला.

Execute the killers of Vaishnavism | वैष्णवीच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या

वैष्णवीच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या

googlenewsNext
ठळक मुद्देसावता परिषदेने कली मागणी : जिल्हाधिकाऱ्यांमार्फत उपमुख्यमंत्र्यांना निवेदन सादर

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जालना जिल्ह्यातील मंठा येथे नवविवाहित तरुणीची क्रुररित्या हत्या करण्यात आली. मन हेलावून टाकणारी ही घटना असून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी सावता परिषदेच्या वतीने जिल्हाधिकाºयांमार्फत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
काही दिवसांपूर्वी मंठा येथील वैष्णवी गोरे हिचा विवाह नुकताच झाला होता. विवाह झाल्यानंतर ती माहेरी आली होती. गावातीलच शेख अलताप याने विवाहितेवर भरदिवसा चौकात चाकूने वार करीत तरुणीची हत्या केली. या घटनेचे गावासह देशात तीव्र पडसाद उमटले. या गंभीर बाबीची दखल घेत आरोपी शेख अलताप याला फाशीची शिक्षा होण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालवून या खटल्यात अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अन्यथा सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांच्या नेतृत्त्वात राज्यभर तीव्र आंदोलने करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला. निवेदन देताना भास्कर वाळके, अशोक मानकर, विनय डहाके, ज्ञानेश्वर हिवसे, पुंडलिक फाटे, संजय भगत, अरुण नाचणकर, रमेश वाळके, सुनील काळे, हरिदास किचक, पुंडलीक फाटे यांची उपस्थिती होती.

Web Title: Execute the killers of Vaishnavism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून