शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
6
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
7
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
8
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
9
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
10
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
11
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
12
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
13
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
14
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
15
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
16
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
17
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
18
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
19
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
20
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी

ईव्हीएम हटाव, बॅलेट लाओ जनआंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 6:00 AM

आंदोलनाच्या मंचावरून ईव्हीएम तज्ज्ञ व शास्त्रज्ञ हरिप्रसाद, अनुपम सराफ, रमेश बेलमकोंडा, राहुल मेहता, निरंजन टकले यांनी ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅटच्या वापरातून कशाप्रकारे भारतीय जनतेच्या मतांची चोरी केली जाते, हे सप्रमाण दाखवून दिले आहे.

ठळक मुद्देसर्वपक्षीय लोकशाही बचाव अभियानचे एसडीओंना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : महाराष्ट्र विधानसभेची आगामी निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यात यावी म्हणून सर्वपक्षीय लोकशाही बचाव अभियान व नागरिकांनी ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव असे नारे देत नषेध केला. निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्य निवडणूक आयुक्त व केंद्रीय निवडणूक आयोग यांना देण्यात आले.ईव्हीएम हटाव बॅलेट लाओ हे जन आंदोलन संपूर्ण राज्यात पुकारले आहे. या आंदोलनाला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र विधानसभेची आगामी निवडणूक ही केवळ मतपत्रिकेवरच घेण्यात यावी.सर्वपक्षीय लोकशाही बचावच्या वतीने सांगण्यात आले की, लोकांचे दोस्त या संघटनेच्या वतीने केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोगाचे प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनीकुमार यांना लेखी निवेदन देऊन ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर (बॅलेट) मतदान घेण्याची मागणी केली होती. त्याची दखल न घेता लोकसभेच्या निवडणुका या ईव्हीएमद्वारेच घेण्यात आल्या, हा लोकभावनेचा अनादर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले.मतदानाचा अधिकार दिला. तो ईव्हीएमने हिरावून घेतला गेला आहे. निवडणूक नि:पक्ष होऊ देण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाचीच आहे.आंदोलनाच्या मंचावरून ईव्हीएम तज्ज्ञ व शास्त्रज्ञ हरिप्रसाद, अनुपम सराफ, रमेश बेलमकोंडा, राहुल मेहता, निरंजन टकले यांनी ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅटच्या वापरातून कशाप्रकारे भारतीय जनतेच्या मतांची चोरी केली जाते, हे सप्रमाण दाखवून दिले आहे.भारतीय मतदार म्हणून ईव्हीएम मशीन कसे ‘टेम्पर’ केले जाते, हे उघड करून दाखवू शकतो, असेही निवेदनात म्हटले आहे. आगामी कोणत्याही निवडणुका बॅलेट पेपरवर होणे आवश्यक आहे. लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर उघड झालेल्या आकडेवारीतील विसंगतीवर अजूनही समाधानकारक स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. ईव्हीएमच्या मतदानातील आकडेवारी जुळत नाही. हे संशयास्पद आहे. जर्मनीच्या सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम हे असंविधाानिक असल्याचा निर्णय दिला आहे. ईव्हीएम कसे टेम्पर होऊ शकते, हे जगभरातील तज्ज्ञांनी दाखवले आहे. या विषयावर वादविवाद, चर्चा, कोर्ट-कचेरी न करता विधानसभेच्या निवडणुका बॅलेटवरच घ्याव्यात. अन्यया रोष व्यक्त होण्याची शक्यता आहे.निवेदनाची योग्य ती दखल घ्यावी, अशी मागणी शालीक डेहणे, सौरभ तिमांडे, अनिल जवादे, मिर्झा परवेज बेग, गौरव तिमांडे, शकील अहमद, मधुसूदन हरणे, मोहम्मद इक्बाल, जितेंद्र शेजवळ, निखिल वडमअलवार, पंकज चौधरी, लक्ष्मीकांत जवादे, विक्की गिरडे, संजय डोंगरे, कोठेकर, महेश माकडे, दिनेश वाघ, पाटील, संदेश मून यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :EVM Machineएव्हीएम मशीन