शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

३२ वर्षांनंतरही संपादित जमिनी सातबारावरच

By admin | Updated: June 22, 2016 01:54 IST

शासनाने सिंचनासाठी धरणांची निर्मिती केली. तालुक्यातही अप्पर वर्धा धरणाच्या डाव्या कालव्याची निर्मिती झाली.

शेतकऱ्यांकडून संपादित जमिनीचे होताहेत खरेदी-विक्रीचे व्यवहार अमोल सोटे आष्टी (शहीद)शासनाने सिंचनासाठी धरणांची निर्मिती केली. तालुक्यातही अप्पर वर्धा धरणाच्या डाव्या कालव्याची निर्मिती झाली. यावेळी बुडीत क्षेत्रातील जमिनी संपादित केल्या. त्याचा मोबदलाही शेतकऱ्यांना देण्यात आला; मात्र शासकीय ‘काम अन् वर्षोगिनती थांब’ याचा प्रत्यय येथे येत आहे. कालव्यांसाठी संपादित जमिनीची आराजी ३२ वर्षांनंतरही सातबारावर कायम आहे. या नोंदी कमी करण्याचे काम तहसीलदार व पटवाऱ्यांचे आहे. याकडे त्यांचे दुर्लक्ष झाल्याचे उघड होत आहे. परिणामी शेतकरी या संपादित जमिनीची खरेदी विक्री करीत असल्याचे समोर येत आहे. अप्पर वर्धा प्रकल्पाचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते १८ डिसेंबर १९७६ रोजी झाले. या धरणाअंतर्गत डावा कालवा ४२.४० किमी तर उजवा कालवा ९५.५० किमी बांधण्यात आला. त्याचे एकूण सिंचनक्षेत्र १ लाख ४ हजार ४०० हेक्टर आहे. सिंचन क्षमता एकूण लाभक्षेत्र १ लक्ष १६ हजार ९७० हेक्टर असून मशागत योग्य लाभक्षेत्र ९३ हजार ६०३ हेक्टर, सिंचनाखाली लाभक्षेत्र ७० हजार १६९ हेक्टर आले आहे. या धरणाचे काम १९९३ साली पूर्ण झाले. १९८२ मध्ये तालुक्यातील जमीन डाव्या कालव्यासाठी संपादीत करून मोबदला देण्यात आला. कालवे, पाटसऱ्या बांधकाम पूर्ण झाले. शेतकऱ्यांच्या सातबारावर एकूण आराजीमधून बुडीत क्षेत्राची (संपादित) आराजी कमी होणे आवश्यक असताना तसे झाले नाही. त्या आजही कायम आहे. शेतकऱ्यांनी तहसीलदार कार्यालयाकडे मागणी करूनही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे शेतकरी खरेदी-विक्री करताना पूर्ण जमिनीचीच करीत आहे.