शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

कामात आनंद मानला की सगळं जमतं!

By admin | Updated: January 24, 2015 22:59 IST

आतापर्यंतचं आयुष्य केवळ कष्ट उपसण्यात गेलं. पण हाताला चव होती म्हणून लोकांना खाऊ घालण्याचं काम इमानदारीनं केलं. मुख्य म्हणजे त्यात समाधान मानलं. त्यामुळे लोकही चांगलच बोलतात.

रस्त्यावरचे जीवन : कामाच्या धडपडीने दिले आशाबार्इंना बळपराग मगर - वर्धाआतापर्यंतचं आयुष्य केवळ कष्ट उपसण्यात गेलं. पण हाताला चव होती म्हणून लोकांना खाऊ घालण्याचं काम इमानदारीनं केलं. मुख्य म्हणजे त्यात समाधान मानलं. त्यामुळे लोकही चांगलच बोलतात. हे सगळ आशाबाई ठेल्यावर काम करताना सहज सांगतात. कामाची लय अचूक साधत त्या आपल्या भावनांना वाट मोकळी करताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सारं काही सांगून जातो. ४५ ते ५० च्या आसपास असलेल्या आशा राम गोडे थोडीथोडकी नव्हे तर १३ वर्षांपासून आर्वी नाका परिसरात ठेला चालवितात. त्या सांगतात, अगदी सहा महिन्याच्या असतानाच त्यांचा हात भाजला. त्यामुळे बोटांना काहीसं अधूपन आलं. शिक्षण जेमतेम तिसरीपर्यंतच, घरची परिस्थिती बेताचीच. त्यामुळे घरोघरी स्वयंपाक करायला सुरुवात केली. लग्नानंतरही सगळं लयबद्ध सुरू होत. कामाची धडपड आणि येत असलेला स्वयंपाक पाहून मदतीचा हात दिलेल्या काही जवळच्यांनी स्वतंत्र ठेला टाकून स्वत:चा व्यवसाय टाकण्याचा सल्ला दिला. सुरुवातीला भीती वाटली पण आपण सर्वांशी चांगलं असलं की सगळे आपल्याशीही चांगलच वागतात या मतावर विश्वास ठेवत ठेला सुरू केला. आज पोटाची निकड भागते. लोकही खाऊन सुखी होतात. मग आणखी काय हवं. मूल बाळ नाही, नवऱ्याच्या डोळ्याचं आॅपरेशन झालं आहे. त्यामुळे आता केवळ नवऱ्यासाठीच जगायच आहे. आतापर्यंत कामात देव मानला. आताही तेच करायचं असं जगण्याचं साधं सोपं तत्वज्ञान त्या काम करतानाच सांगून मोकळ्या होतात.