शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांनी पुरला सांबराचा मृतदेह

By admin | Updated: May 8, 2015 01:53 IST

केहझर परिसरातील गणेशखोरी जंगलात सांबराचा मृतदेह झुडपातील खड्ड्यात फेकण्यात आला़ याबाबत वृत्त उमटताच अधिकारी,

सेलू : केहझर परिसरातील गणेशखोरी जंगलात सांबराचा मृतदेह झुडपातील खड्ड्यात फेकण्यात आला़ याबाबत वृत्त उमटताच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी फेकलेला मृत सांबराचा देह उचलून गणेशखोरी जंगल शिवारात जेसीबीने खड्डा करून पूरला़ यातही शवविच्छेदन करण्यास फाटाच देण्यात आला़ यामुळे हे प्रकरण चांगलेच चर्चिले जात आहे़सहायक वनपरिक्षेत्र अधिकारी वाघमारे प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून खोटी माहिती देत दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही समोर आले आहे़ केळझर नजीकच्या गणेशखोरी जंगलाच्या भोवताल सौर कुंपण लागले आहे़ या कुंपणाच्या आत सोमवारी एक सांबर मृतावस्थेत पडून असल्याची माहिती वाघमारे यांना मिळाली़ त्यांनी रितसर पंचनामा करून घटनास्थळीच पशुचिकित्सकांद्वारे शवविच्छेदन करणे व जंगल परिसरात खड्डा खणून ते पुरविणे गरजेचे होते; पण तसे झाले नाही़ काही महिला वनरक्षकांच्या साह्याने सदर मृत सांबर दोराने ओढत आणले़ एका वाहनाने फरफटत नेऊन शेतकरी ताराचंद लोखंडे यांच्या पडीत शेतातील झुडपात मृतदेह ढकलून देत तेथून पळ काढला. हे प्रकरण वन विभागावर शेकू नये म्हणून गरीब शेतकऱ्यांना फसविण्याचा प्रयत्न वन विभागाचे अधिकारी करीत असल्याचेच दिसते़ वन विभागातील अधिकारी, कर्मचारी आपल्या चुका शेतकऱ्यांवर ढकलण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसते़ शवविच्छेदन केले नसताना ते सोपस्कार पार पडल्याचे सांगण्यात आले़ या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून सहायक वनपरिक्षेत्र अधिकारी वाघमारे व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांसह नागरिकांद्वारे होत आहे़(शहर प्रतिनिधी)