शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
4
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
5
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
6
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
7
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
8
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
9
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
10
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
11
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
12
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
13
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
14
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
15
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
16
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
17
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
18
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
19
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
20
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत कंपनीकडे जोडणीचा रेकॉर्ड नाही

By admin | Updated: June 4, 2014 00:15 IST

येथील एका शेतकर्‍याच्या शेतात कृषी पंपाकरिता वीज जोडणी असताना कंपनीच्यावतीने त्या शेतकर्‍याला जोडणीकरिता पुन्हा डिमांड भरण्याचे फर्मान काढले आहे. हे फर्मान पाहून

कृषी पंप : शेतकर्‍याला पुन्हा डिमांड भरण्याची नोटीस वायगाव (निपाणी) : येथील एका शेतकर्‍याच्या शेतात कृषी पंपाकरिता वीज जोडणी असताना कंपनीच्यावतीने त्या शेतकर्‍याला जोडणीकरिता पुन्हा डिमांड भरण्याचे फर्मान काढले आहे. हे फर्मान पाहून शेतकरी चांगलाच अवाक् झाला आहे. नजीकच्या भिवापूर येथील शेतकरी नाना वामनराव वाणी यांनी त्यांच्या शेतात विद्युत वितरण कंपनीकडे विद्युत मिटरची मागणी केली. या मागणीनुसार सन २0११-१२ मध्ये शेतात विद्युत जोडणी सुद्धा करण्यात आली. त्यात नियमाप्रमाणे ४ हजार ४६0 रुपयांचा भरणा केला. विद्युत वितरण कंपनीच्या वायगाव (नि.) येथील अभियंत्यांनी टेस्ट रिपोर्ड सुद्धा दिला. शेतात खांब टाकून विद्युत सुरू करण्यासाठी लाईनमन दुबे यांनी मिटर सुद्धा बसून दिले; मात्र २0११-१२ पासून विद्युत बिल देण्यात आले  नाही. अशात कंपनीने जर एकाच वेळी मोठय़ा रकमेचे देयक दिले तर ते भरणे कठीण जाईल असे म्हणत वाणी यांनी कनिष्ठ अभियंता विनोद मसकरे यांच्याशी संपर्क  साधत देयक का आले नाही या बाबत विचारणा केली. मात्र या शेतकर्‍यांच्या विद्युत पुरवठय़ा बाबत कोणतेही रेकॉर्ड विद्युत वितरण कंपनीकडे नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. तुम्ही पुन्हा नवीन डिमांड भरा नवीन विद्युत जोडणी करा असा सल्ला त्यांना देण्यात आला. यात कंपनीत कुठलीही नोंद नसताना या शेतकर्‍याला वीज पुरवठा कसा झाला, याची कंपनीच्या कार्यात कुठलीही नोंद नाही, यामुळे कंपनीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर येत आहे. याकडे कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष देत कारवाई करण्याची मागणी होत आहे. याकडे जिल्ह्याच्या अधिकार्‍यांनी लक्ष देत शेतकर्‍याची समस्या मार्गी लावण्याची गरज निर्माण झाली आहे. (वार्ताहर)