१.२० लाख व्यक्तींना दिली ई-पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 05:00 AM2020-08-01T05:00:00+5:302020-08-01T05:00:35+5:30

सुरूवातीला ही प्रक्रिया पोलीस प्रशासनाकडून केल्या जात होती. पण नंतर याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाकडे निश्चित करून एक विशेष कक्ष तयार करण्याच्या सूचना शासनाने प्रत्येक जिल्ह्याला दिल्यात. त्याच सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्या मार्गदर्शनात निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांच्या नेतृत्त्वात विशेष चमू तयार करण्यात आली आहे.

E-pass issued to 1.20 lakh persons | १.२० लाख व्यक्तींना दिली ई-पास

१.२० लाख व्यक्तींना दिली ई-पास

Next
ठळक मुद्देनागरिकांना दिलासा : ऑनलाईन पद्धतीने १.६५ लाख अर्ज झाले प्राप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोना काळात विविध कामानिमित्त वर्धा जिल्ह्याबाहेर जाण्यासह जिल्ह्यात येण्यासाठी आतापर्यंत तब्बल १.२० लाख व्यक्तींना जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने ई-पास देण्यात आली आहे. वेळीच ई-पास मिळाल्याने नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात येणाऱ्या आणि जिल्ह्याबाहेर जाणाºया व्यक्तींची माहिती शासनाकडे रहावी या हेतूने ई-पास सेवा सुरू करण्यात आली. सुरूवातीला ही प्रक्रिया पोलीस प्रशासनाकडून केल्या जात होती. पण नंतर याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाकडे निश्चित करून एक विशेष कक्ष तयार करण्याच्या सूचना शासनाने प्रत्येक जिल्ह्याला दिल्यात. त्याच सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्या मार्गदर्शनात निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांच्या नेतृत्त्वात विशेष चमू तयार करण्यात आली आहे. याच चमूच्या माध्यमातून सध्या नागरिकांना ई-पास दिली जात आहे. आतापर्यंत १ लाख ६५ हजार नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीचा वापर करून ‘कोविड-१९ डॉटएमएच पोलीस डॉट इन’ या बेबसाईटवर ई-पाससाठी आवश्यक कागदपत्र जोडून आवेदन केले. त्यापैकी १ लाख २० हजार व्यक्तींना ई-पास देण्यात आली आहे. तर ४५ हजार अर्ज रिजेक्ट करण्यात आले आहेत. अर्ज प्राप्त झाल्यानंतर झटपट ई-पास देण्यासाठी पुनम वाळूकर, तुषार शिंदे, अजय लाडेकर, ज्योत्स्रा कुर्जेकार, रंजना तडस, रेणूका रासपायले, गणेश कुलकर्णी, मारोती जायभाये, भीमराव खरतडे व राखी जयस्वाल प्रयत्न करतात.

Web Title: E-pass issued to 1.20 lakh persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.