शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
4
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
5
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
6
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
7
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
8
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
9
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
11
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
12
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
15
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
16
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

खड्डेमय रस्त्यामुळे वाहतूकदारांचा जीव धोक्यात

By admin | Updated: November 27, 2014 23:39 IST

कोट्यवधी रुपयांचा निधी रस्ता कामावर खर्च होत असला तरी रस्त्याची दुरवस्था संपत नसल्याचेच दिसते़ दररोज होणारे अपघात कित्येकांचे कुटुंब उद्ध्वस्त करीत आहे; पण कुंभकर्णी झोपेत

आकोली : कोट्यवधी रुपयांचा निधी रस्ता कामावर खर्च होत असला तरी रस्त्याची दुरवस्था संपत नसल्याचेच दिसते़ दररोज होणारे अपघात कित्येकांचे कुटुंब उद्ध्वस्त करीत आहे; पण कुंभकर्णी झोपेत असलेल्या संबंधित विभागाला जाग येताना दिसत नाही़ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी सामान्यांतून करण्यात येत आहे़
वर्धा ते आर्वी हा जिल्हा मार्ग मरणवाट ठरत आहे़ या रस्त्यावर खड्ड्यांची मालिका अपघाताची प्रतीक्षा करताना दिसते़ सुकळी (बाई) टी-पाँईट जवळील खड्ड्याने तर अनेकांना दवाखान्याचा रस्ता दाखविला़ पिपरी गावाजवळील खड्ड्याला खड्डा म्हणावे की महाखड्डा, हेच वाहनचालकांना कळत नाही. वारेमाप पैशांची उधळण करूनही रस्त्याचे हाल जैसे थे आहे. शासनाच्या निधीतून अधिकारी मालामाल झालेत, कत्राटदार कुबेर बनलेत, शासनाची तिजोरी रिकामी झाली; पण रस्ते सुस्थितीत आले नाहीत़ वाहन चालविताना वाहनधारकांना जीव मुठीत घेऊनच मार्गक्रमण करावे लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग सध्या कुरण ठरले आहे़ संबंधित विभागाचे अधिकारी वातानुकूलित कक्षातून बाहेर पडायला तयार नसल्याचेच दिसते़
जिल्हा मार्गाची अत्यंत दुरवस्था असून ग्रामीण भागातील रस्तेही मरणाला स्वस्त झाले आहेत़ पाय ठेवाल तेथे खड्डा दिसतो़ डांबर-गिट्टी नावालाही शिल्लक नसलेले रस्ते पाहायचे असेल तर अधिकाऱ्यांनी आकोली ते आंजी (मोठी) रस्त्यावरून फेरफटका मारला पाहिजे़ मुख्य मार्ग असलेल्या आर्वी ते वर्धा दरम्यान खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत असताना संबंधित विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत़ या मार्गाने वाहने चालविताना वाहन चालकांना कसरत करावी लागत असून प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागत आहे़ रस्त्याच्या या दुरवस्थेमुळे परिसरातील ग्रामस्थांना अपघातांना सामोरे जावे लागत असल्याचे दिसते़ सार्वजनिक बांधकाम विभागाने या जिल्हा मार्गाच्या दुरूस्तीचा मुहूर्त काढून ग्रामस्थांना उपकृत करावे, अशी मागणी होत आहे़(वार्ताहर)