शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

लिंक फेलमुळे बँकेचे व्यवहार तीन दिवसांपासून ठप्प

By admin | Updated: May 25, 2015 02:14 IST

स्थानिक बॅँक आॅफ इंडिया शाखेची लिंक फेल असल्याने गुरूवारपासून आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहे.

रोहणा : स्थानिक बॅँक आॅफ इंडिया शाखेची लिंक फेल असल्याने गुरूवारपासून आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहे. भर उन्हात ग्राहक लिंक येईल म्हणून दररोज चकरा मारत आहेत; पण त्यांच्या पदरी निराशाच येत असल्याचे दिसते. बॅँक प्रशासनाने ग्राहकांना बसण्याची बाक तर सोडाच; पण पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था केली नाही. यामुळे ग्राहकांमध्ये असंतोष पसरला आहे.शेतकऱ्यांची वर्धा जिल्हा सहकारी बॅँक व्यावहारिक दृष्ट्या बंद आहे. यामुळे रोहणा व परिसरातील २०-२१ गावांतील २५ हजार ग्राहकांना बॅँक आॅफ इंडिया शाखा रोहणा ही एकमेव बॅँक आहे. सदर बॅँकेची लिंक बीएसएनएल या राष्ट्रीय चॅनेलच्या सेवेशी जोडली आहे. राष्ट्रीय चॅनेल असले तरी बीएसएनएलची सेवा अत्यंत बेभरवशाची आहे, हे नव्याने सांगायची गरज नाही. बीएसएनएलची सेवा कधी बंद पडेल व किती दिवस बंद राहील, हे सांगणे कठीण आहे. सदर सेवा बंद पडली की, बॅँकेतील लिंक फेल होते. परिणामी, बॅँकेतील आर्थिक व्यवहार ठप्प होतात. व्यवहार ठप्प होणे व एक-दोन दिवसांत पुन्हा सुरू होणे, हा नित्यक्रम गत कित्येक वर्षांपासून सुरू आहे. ग्राहक नाराजी व्यक्त करतात; पण बॅँक प्रशासन यात सुधारणा करायला तयार नाही. अधिकारी लिंक फेल आहे, असा फलक लावण्यातच धन्यता मानतात.गुरूवारी पुन्हा बॅँकेतील लिंक फेल झाली. २१ ते २३ तब्बल तीन दिवस लिंक सुरू झाली नाही. रविवारी बॅँक बंद होती. यामुळे चार दिवस आर्थिक व्यवहार ठप्प होते. दरम्यान, ग्राहकांची गर्दी होती. सूर्य आग ओकत असताना बॅँक प्रशासनाने सावलीत बसण्याची व पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था केली नाही. यामुळे ग्राहकांत असंतोष पसरला आहे. बॅँक सुरू झाली तेव्हा हीच शाखा समाजसेवेवर काही निधी खर्च करीत होती; पण आता ग्राहकांचाही विसर पडल्याचेच दिसते.(वार्ताहर)