शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

१३४ व्यक्तींना परदेशात वाहन चालविण्याचा परवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 05:00 IST

शिक्षण आणि नोकरीच्या कारणामुळे अनेक व्यक्ती विदेशात जातात. यापैकी काही व्यक्ती इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्ससाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे रीतसर आवेदन सादर करतात. याच आवेदकांची प्रकरणे सध्या अवघ्या ७२ तासांत निकाली काढून विदेशात जाणाऱ्यांना व रीतसर इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स प्राप्त करू इच्छिणाऱ्यांना परदेशातही वाहन चालविण्याचा परवाना दिला जात आहे.

ठळक मुद्दे७२ तासांत आवेदन काढले जातेय निकाली

महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाने मागील दहा वर्षे तीन महिन्यांत तब्बल १३४ व्यक्तींना इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स दिले आहे. त्यामुळे या व्यक्तींना परदेशातही वाहतुकीचे नियम पाळत वाहन चालविण्याची मुभा मिळाली आहे. शिक्षण आणि नोकरीच्या कारणामुळे अनेक व्यक्ती विदेशात जातात. यापैकी काही व्यक्ती इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्ससाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे रीतसर आवेदन सादर करतात. याच आवेदकांची प्रकरणे सध्या अवघ्या ७२ तासांत निकाली काढून विदेशात जाणाऱ्यांना व रीतसर इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स प्राप्त करू इच्छिणाऱ्यांना परदेशातही वाहन चालविण्याचा परवाना दिला जात आहे. मागील दहा वर्षे तीन महिन्यांत वर्धा येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाने तब्बल १३४ व्यक्तींना इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स दिले असून सर्वाधिक इंटरनॅशनल लायसन्स सन २०१६-१७ व २०१२-१३ मध्ये देण्यात आली आहेत.

आवेदनासोबत हवी ही कागदपत्रे इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आवेदन करताना आवेदकाला विहित नमुन्यात ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून आवेदनासोबत भारतीय व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, व्हिसा आदी कागदपत्राची झेरॉक्स प्रत जोडणे गरजेचे आहे.

एक वर्षाची राहते मुदतरीतसर आवेदन सादर करून इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स मिळविणाऱ्यांची प्रकरणे अवघ्या ७२ तासांत निकाली काढली जात असून या लायसन्सचा कालावधी एक वर्षांचा राहत असल्याचे सांगण्यात आले. तर त्यानंतर हे लायसन्स रिनिव्हल करता येते.

पूर्वी स्वीकारले जायचे ऑफलाइन अर्जइंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्ससाठी पूर्वी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जायचे; पण आता शासनाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून ऑनलाइन पद्धतीने आवेदन स्वीकारले जात आहेत. आवेदकाला कुठलीही अडचण येत असल्यास उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचारी त्यांना योग्य मार्गदर्शन करीत असल्याचे चित्र बघावयास मिळते.

मागील दहा वर्षे तीन महिन्यांच्या काळात १३४ व्यक्तींना इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स देण्यात आले आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे प्राप्त झालेली इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्सची प्रकरणे जास्तीत जास्त ७२ तासांत निकाली काढली जात आहे.- विजय तिराणकर, सहा. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वर्धा. 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस