शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षित निवारा देता का, निवारा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 06:00 IST

आर्वी आणि वर्धा तालुक्याच्या सिमेवर कुऱ्हा धरण आहे. सध्या ते १०० टक्के भरले असून मागील आठवड्यात याच धरणाच्या भिंतीला तडा गेल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर वर्धा पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांनी या धरणाची पाहणी केली होती.

ठळक मुद्देबाऱ्हा सोनेगाववासीयांचा सवाल : धरणफुटीच्या भीतीने घर सोडले

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दिवसभर शेतात राबून थकलेले बाऱ्हा सोनेगाव येथील नागरिकांनासह चिमुकल्यांना सध्या रात्र शेतात पाल टोकून तयार केलेल्या झोपडीत काढावी लागत आहे. बाऱ्हा सोनेगाव नजीकच्या कुऱ्हा धरणाच्या भिंतीला तडा गेल्याने सध्या या गावातील नागरिकांच्या मनात धरणफुटीबाबत कमालीची भीती आहे. सदर ग्रामस्थांच्या पुनर्वसनाच्या मागणीकडे जिल्हा प्रशासनाकडून अनेक वर्षांपासून दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानली जात आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांकडून सध्या ‘सुरक्षीत निवारा देता का हो निवारा’ अशी मागणी होत आहे.आर्वी आणि वर्धा तालुक्याच्या सिमेवर कुऱ्हा धरण आहे. सध्या ते १०० टक्के भरले असून मागील आठवड्यात याच धरणाच्या भिंतीला तडा गेल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर वर्धा पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांनी या धरणाची पाहणी केली होती. शिवाय तेथील नागरिकांशी संवादही साधला होता. इतकेच नव्हे तर महसूल विभागाने दक्षता म्हणून याच गावातील ४७ कुटुंबातील एकूण १४७ जणांना रसुलाबाद येथील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात हलविले होते. तर यापूर्वीही बाऱ्हा सोनेगाव येथील ग्रामस्थांना पुराच्या धोक्यामुळे अनेकदा सुरक्षीत ठिकाणी हलविण्यात आले होते. वारंवार पुराचा धोका राहत असल्याने बाऱ्हा सोनेगाव या गावाचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी तालुका आणि जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानली जात असल्याचे दिसून येते. तर सध्या या गावातील नागरिकांना धरणफुटीच्या भीतीमुळे मोठा धोका पत्कारून शेतात पाल टोकून त्याच झोपडीत रात्र काढावी लागत आहे.सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोकाबाºहा सोनेगाव येथील नागरिक सध्या धरणफुटीच्या भीतीमुळे शेतातील झोपड्यांमध्ये कंदीलांच्या सहाय्याने रात्र काढत आहेत. इतकेच नव्हे तर ज्या परिसरात ते रात्र काढत आहेत. त्या परिसरातील सरपटणाºया प्राण्यांचा वावर असून हा धोका सध्या पत्कारत आहेत.विद्यार्थ्यांना शैक्षणिक फटकाबाºहा सोनेगाव येथील शाळकरी मुल-मुली रसुलाबाद व वर्धा येथे शिक्षणासाठी येतात. इतकेच नव्हे तर शाळा व महाविद्यालयात शिक्षणाचे धडे घेतल्यानंतर ते गावाची वाट धरतात. परंतु, सध्या त्यांना काळोखातच रात्र काढावी लागत असल्याने त्यांचा गृहपाठ पूर्ण होत नाही. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

टॅग्स :Damधरण