शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा संघाने दूध संकलन केले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 05:00 IST

वर्धा जिल्हा दुध उत्पादक संघाला ७ ते ८ हजार लीटर दुध दररोज संकलन करण्याची मुभा देण्यात आली होती. त्यानुसार दररोज दुधाचे संकलन जिल्ह्यातील सहकारी दुध उत्पादक संस्थाकडून केले जात होते. पालकमंत्री तथा राज्याची दुग्ध उत्पादन व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनीही दुध संकलन बंद करू नका अशा सुचना आढावा बैठकीत दिल्या होत्या.

ठळक मुद्देशेतकरी अडचणीत : संचारबंदीत दूध फेकावे लागत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्यात सर्वत्र दुध पुरवठा व वाहतुक सुरू असतांना वर्धा जिल्हा दुध उत्पादक संघाने मात्र दुध संकलीत करण्याचे काम बंद केले आहे. त्यामुळे दुध उत्पादक शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे. आपले दुध त्याला ग्रामीण भागातून शहरातून विक्रीसाठी नेता येत नाही. त्यामुळे संचारबंदीच्या काळात दुध फेकून देण्याची वेळ जिल्हा दुध उत्पादक संघाने शेतकऱ्यांवर आणली आहे.वर्धा जिल्हा दुध उत्पादक संघाला ७ ते ८ हजार लीटर दुध दररोज संकलन करण्याची मुभा देण्यात आली होती. त्यानुसार दररोज दुधाचे संकलन जिल्ह्यातील सहकारी दुध उत्पादक संस्थाकडून केले जात होते. पालकमंत्री तथा राज्याची दुग्ध उत्पादन व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनीही दुध संकलन बंद करू नका अशा सुचना आढावा बैठकीत दिल्या होत्या.ही बैठक पार पडताच लगेच दुसºया दिवशी जिल्हा दुध उत्पादक संघाने जिल्ह्यातील सहकारी संस्थांना पत्र पाठवून आपल्या संस्थेकडून दुध संकलीत करणे शक्य होणार नाही त्यामुळे दुध संकलनाचे काम बंद करण्यात येत असल्याचे कळविले आहे.त्यामुळे ग्रामीण भागातून दुध संकलनाचे काम ठप्प झाले आहे. याचा सर्वाधिक फटका दुध उत्पादक शेतकºयांना बसत आहे. संचारबंदी असल्याने घरी पडून असलेले दुधही त्यांना शहराकडे विक्रीसाठी आणता येत नाही. व गावातही दुधाला कोणी ग्राहक नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हे दूध नदी, नाल्यांमध्ये विसर्जीतच करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.पालक मंत्री सुनील केदार यांच्याशी या संदर्भात आपण चर्चा केली. त्यांनी दिनशॉ सह सर्व खाजगी कंपण्यांना दुध संकलीत करावे अशा सुचना दिल्या होत्या. वर्धा जिल्हा दुध उत्पादक संघाकडे नागपूर जिल्हा संघाचेही ७ हजार लीटर दुध दररोज येत असते. मात्र आपल्या येथून वारणा दुध संघाकडे जाणारा टँकर घेण्यास त्यांनी नकार दिला आहे. त्यामुळे आपल्या जवळ दुध डंप होत आहे. म्हणून ग्रामीण भागातून दुधाची खरेदी थांबवावी लागली आहे. यासंदर्भात आपण ना.सुनील केदार यांच्याकडे पाठ पुरावा करीत आहोत. यात दुध उत्पादक शेतकºयांचे नुकसान होत आहे.- सुनील राऊत, अध्यक्ष वर्धा जिल्हा दुध उत्पादक संघ.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या