शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
3
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
6
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
7
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
8
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
9
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
10
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
11
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
12
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
13
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
14
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
15
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
16
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
17
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
18
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
19
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
20
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोविडने घेतला 820 पुरुषांसह 505 महिलांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 05:00 IST

जिल्ह्यात १० मे २०२० रोजी कोविडचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर कोविड बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात जिल्ह्यात कोविडच्या पहिला आणि दुसऱ्या लाटेने उच्चांकी गाठत जिल्ह्यात मृत्यू तांडव करण्याचा प्रयत्न केला. सध्या जिल्ह्यात केवळ तीन ॲक्टिव्ह कोविड बाधित असून नवीन रुग्ण सापडण्याची गती बऱ्यापैकी मंदावली आहे. काेविड पॉझिटिव्हिटी दर बऱ्यापैकी खाली आल्याने जिल्हा प्रशासनाने लादलेले अनेक कठोर निर्बंधही मागे घेतले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाची दुसरी लाट जिल्ह्यात बऱ्यापैकी ओसरली असली तरी आतापर्यंत कोरोना या विषाणूने जिल्ह्यातील तब्बल १ हजार ३२५ व्यक्तींचा बळी घेतल्याचे वास्तव आहे. यात ८२० पुरुष तर ५०५ महिलांचा समावेश आहे. कोविड मृतात वयाची साठी पार केलेले सर्वाधिक असून कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने दक्ष राहून जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.जिल्ह्यात १० मे २०२० रोजी कोविडचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर कोविड बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात जिल्ह्यात कोविडच्या पहिला आणि दुसऱ्या लाटेने उच्चांकी गाठत जिल्ह्यात मृत्यू तांडव करण्याचा प्रयत्न केला. सध्या जिल्ह्यात केवळ तीन ॲक्टिव्ह कोविड बाधित असून नवीन रुग्ण सापडण्याची गती बऱ्यापैकी मंदावली आहे. काेविड पॉझिटिव्हिटी दर बऱ्यापैकी खाली आल्याने जिल्हा प्रशासनाने लादलेले अनेक कठोर निर्बंधही मागे घेतले आहेत. सध्या वर्धा जिल्ह्याचा आर्थिक गाढा हळूहळू रुळावर येत असला तरी कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १ हजार ३२५ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून त्यात ६१ ते ७० वयोगटातील २२८ पुरुष व १३७ महिला असे एकूण ३६५ व्यक्तींचा समावेश आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने दक्ष राहण्याची गरज आहे. प्रतिबंधात्मक लस घेणे, मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे सध्या फायद्याचे आहे.

जिल्ह्यात ॲक्टिव्ह कोविड बाधित नाममात्र असले तरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन यासह कोविडची प्रतिबंधात्मक लस घेणे हा सध्या खबरदारीचा प्रभावी उपाय आहे. त्यामुळे नागरिकांनीही नजीकच्या केंद्रावर जावून काेविडची लस घेत स्वत: व स्वत:च्या कुटुंबाला सुरक्षित करून घ्यावे. - डॉ. प्रवीण वेदपाठक, प्रभारी जिल्हा आरोग्य        

अधिकारी, वर्धा.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या