शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

दवाखाना सुरु; पण सहायक आयुक्त बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2020 5:00 AM

लॉकडाऊनच्या कालावधीत पशुसंवर्धन विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी मुख्यालयाकडे पाठ फिरविली आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी आष्टी व समुद्रपूर तालुका वगळता इतर सहा तालुक्यामध्ये तालुका पशुचिकित्सालय आहेत. यापैकी देवळी व कारंजा (घा.) येथील पशुचिकित्सालयातील सहाय्यक आयुक्त लॉकडाऊनपासून कार्यालयात फिरकलेच नसल्याचे पशुपालकांकडून सांगितले जात आहे.

ठळक मुद्देमुख्यालयाला दांडी : तालुका पशू चिकित्सालयातील प्रकार

आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना विषाणूच्या प्रतिबंधित उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहे. तरीही राज्यस्तरीय तालुका पशू चिकित्सालयातील काही सहाय्यक आयुक्तांनी आदेशाला केराची टोपली दाखवित लॉकडाऊनपासून कार्यालयाचे तोंडही पाहिले नाही. परिणामी सहाय्यक कर्मचाऱ्यांकडून कामाचा भार वाहिला जात असल्याची पशुपालकांकडून ओरड होत आहे.जिल्ह्यामध्ये पशूधनाची मोठी संख्या असून मोठा ढोल पिटत पहिल्यांदाच ऑनलाईनपद्धतीने टॅबव्दारे विसावी पशूगणना झाली मात्र, जिल्हा आणि तालुकास्तरीय आकडेवारी अद्याप गुलदस्त्यात असल्याने जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.अशातच या लॉकडाऊनच्या कालावधीत पशुसंवर्धन विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी मुख्यालयाकडे पाठ फिरविली आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी आष्टी व समुद्रपूर तालुका वगळता इतर सहा तालुक्यामध्ये तालुका पशुचिकित्सालय आहेत. यापैकी देवळी व कारंजा (घा.) येथील पशुचिकित्सालयातील सहाय्यक आयुक्त लॉकडाऊनपासून कार्यालयात फिरकलेच नसल्याचे पशुपालकांकडून सांगितले जात आहे. देवळी येथील सहाय्यक आयुक्त डॉ. सुहास अलोने हे यवतमाळ तर कारंजा (घा.) येथील सहाय्यक आयुक्त डॉ. मोहन खंडारे हे नागपुरात वास्तव्यास असतात.कोरोनामुळे जिल्ह्याच्या सीमाबंद असल्याने हे दोन्ही अधिकारी स्वगृही लॉकडाऊन झाले आहेत. शिवाय कार्यालयात जबाबदार अधिकारी नसल्याने कार्यालयातील कामकाजाचा खोळंबा होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलून मुख्यालयी न राहणाºया या सहाय्यक आयुक्तांवर कारवाई होणार का? असा प्रश्न देवळी व कारंजा (घा.) तालुक्यातील पशुपालकांनी उपस्थित केला आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांची कृपादृष्टीकांरजा येथील सहाय्यक आयुक्त डॉ. मोहन खंडारे हे लॉकडाऊनपासून कार्यालयात आले नसल्याचे स्थानिक पशुपालकांकडून सांगण्यात आले. मात्र सध्या कार्यरत असलेल्या डॉ.घुमडे यांना विचारले असता ते महिन्याभरापासून वैद्यकीय रजेवर आहेत. त्यापूर्वी ते कर्तव्यावर असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे यात कुठे तरी पाणी मुरताना दिसून येत आहे.देवळी येथील सहाय्यक आयुक्त डॉ. सुहास अलोने हे सुद्धा लॉकडाऊनपासून कार्यालयात आले नसल्याचे सांगितले जात आहे. याबाबत माहिती जाणून घेण्याकरिता जिल्हा उपायुक्त डॉ. राजीव भोजने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तर प्रादेशिक पशुसंवर्धन सह आयुक्त डॉ. किशोर कुमरे यांना विचारले असता त्याबाबत माहिती नसल्याचे सांगितले.त्यामुळे या अधिकाºयांवर वरिष्ठांचीही कृपादृष्टी असल्याचे दिसून येत आहे.कारंजा येथील सहाय्यक आयुक्त डॉ.खंडारे यांच्या रजेचा अर्ज ऑनलाईन प्राप्त झाला पण, त्याची तारीख मला माहिती नाही. डॉ. अलोणे यांच्याबद्दल जिल्हा उपायुक्तांकडून किंवा त्यांच्या स्वत: कडून कोणती माहिती मिळाली नाही. सहाय्यक आयुक्तांवर कारवाई करण्याचे अधिकार जिल्हा उपायुक्तांना आहे.डॉ. किशोर कुमरे, सहआयुक्त, प्रादेशिक पशुसंवर्धन विभाग, नागपूर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या