शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम मशीनचे निर्जंतुकीकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 05:00 IST

शहरात असलेल्या एटीएम मशीनद्वारे कोरोनाचा फैलाव होवू शकतो, अशी भीती काही नागरिकांकडून वर्तविली जात आहे. त्यासाठी शहरातील सर्वच एटीएमचे निर्जंतुकीकरण व्हावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन असले तरी नागरिकांची गर्दी जीवनावश्यक वस्तूंसाठी आजही पाहायला मिळते.

ठळक मुद्देमागणी : कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याचे माहिती होताच शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शहरात असलेल्या एटीएम मशीनद्वारे कोरोनाचा फैलाव होवू शकतो, अशी भीती काही नागरिकांकडून वर्तविली जात आहे. त्यासाठी शहरातील सर्वच एटीएमचे निर्जंतुकीकरण व्हावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन असले तरी नागरिकांची गर्दी जीवनावश्यक वस्तूंसाठी आजही पाहायला मिळते. तर शहरातील बँकांमध्येसुद्धा आपल्या खात्यातील पैसे काढण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसून येते. या गर्दीच्या अनुषंगाने बँकेकडून विशेष काळजीदेखील घेतली जात असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. मात्र, शहरातील असलेल्या एटीएम मशीनचे निर्जंतुकीकरण करण्यात आले का, असा प्रश्न नागरिकांकडून विचारल्या जात आहे. शहरात सुमारे २० ते ३० एटीएम मशीन आहेत. त्यापैकी बँक ऑफ इंडिया, एसबीआय, अ‍ॅक्सीस बँकेचे एटीएम बॅचलर रोडवर आहेत. या मशीनमधून अनेक नागरिक पैसे काढतात. त्याचबरोबर शहरातील इतरही एटीएमवरून जास्त प्रमाणात पैसे काढले जातात. त्यामुळे या एटीएम मशीनद्वारे कोरोना विषाणूचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरातील एटीएम मशीन टचस्क्रीन असून स्वत:चा पासवर्ड टाकण्यासाठी एटीएम मशीनवर असणाऱ्या बटणाचा वापर केला जातो. त्यामुळे शहरात असणाऱ्या एटीएमचे निर्जंतुकीकरण करून कोरोनाची साखळी तोडण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या