शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

ओला दुष्काळ, भूसंपादन अन् घरकुलावर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 06:00 IST

जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान केले. याबाबत जिल्हा प्रशासनामार्फत शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी कोणत्या उपायोजना करण्यात आल्या या संदर्भात आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी भिमनवार म्हणाले की, इतर जिल्ह्याच्या तुलनेत परतीच्या पावसामुळे वर्धा जिल्ह्यात नुकसान कमी झाले आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । खासदारांची आढावा बैठक, जिल्हाधिकाऱ्यांनी मांडली बाजू

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : खासदार रामदास तडस यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सदर बैठकीत ओला दुष्काळ, घरकुल, सेलडोह येथील महामार्ग क्रमांक ३६१ मध्ये गेलेल्या घरांच्या भुसंपादन विषयावर सविस्तर चर्चा झाली.जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान केले. याबाबत जिल्हा प्रशासनामार्फत शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी कोणत्या उपायोजना करण्यात आल्या या संदर्भात आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी भिमनवार म्हणाले की, इतर जिल्ह्याच्या तुलनेत परतीच्या पावसामुळे वर्धा जिल्ह्यात नुकसान कमी झाले आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. त्या शेतकºयांच्या शेतीचे जिल्हा प्रशासनामार्फत पंचनामे करण्यात आले आहे. जिल्ह्यात ४३ बाधीत गावात ३१० शेतकऱ्यांच्या एकूण ३०२.१५ हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून त्यांना मदत मिळावी याकरिता प्रशासनाकडे अहवाल पाठविण्यात आला असल्याचे सांगितले. वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल योजना राबविण्यात आली आहे. त्याकरिता काही लाभार्थ्यांना जमिनीचे पट्टे वाटायचे आहे. तसेच लाभार्थ्यांचा प्रलंबीत निधी त्वरीत देण्याची मागणी याप्रंसगी खा. तडस यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली. पट्टे वाटपाच्या अनुषंगाने १३ नोव्हेंबरला बैठक बोलावण्यात आली आहे. शिवाय प्रलंबीत निधीकरिता शासनाकडे मागणी केल्याचे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. सेलडोह येथील महामार्ग ३६१ मध्ये गेलेल्या घरांच्या भुसंपादन विषयीचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रंलबीत असल्यामुळे त्वरीत निकाली लावण्याचा आग्रह खा. तडस यांनी जिल्हाधिकाºयांना केला. त्यावर जिल्हाधिकाºयांनी सदर भुसंपादन (सामान्य) याच्यामार्फत फेरमुल्यांकरण करण्यात आले असून संबधीतांकडून जमीन अवार्ड करुन फेरमुल्यांकनाच्या अनुषंगाने नियमानुसार वाढीव निधी देण्यात येणार असल्याची माहिती याप्रसंगी जिल्हाधिकारी भिमनवार यांनी दिली. बैठकीला जयंत कावळे, जि.प.चे माजी शिक्षण सभापती मिलिंद भेंडे, रवींद्र खोडे, गिरीष कांबळे, उदय मेहुने, रत्नाकर खोडे, संजय इरपाते, सुधीर भुते, नगरविकास अधिकारी शहा, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस