शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

विकास कामांमध्ये हयगय खपवून घेणार नाही

By admin | Updated: June 19, 2016 01:55 IST

लोकसभा मतदार संघातील विविध विमकासात्मक प्रश्न जलदगतीने मार्गी लावण्याकरिता गुरुवारी विश्रामगृह येथे अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

रामदास तडस : आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचनावर्धा : लोकसभा मतदार संघातील विविध विमकासात्मक प्रश्न जलदगतीने मार्गी लावण्याकरिता गुरुवारी विश्रामगृह येथे अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत विकास कामांत हयगय सहन करणार नसल्याचे खडेबोल खासदार रामदास तडस यांनी सुनावले. सर्व विकासकामे विहित वेळेत पूर्ण करून दर १५ दिवसांनी कामाचा प्रगती अहवाल सादर करावा, तसेच वर्धा लोकसभा क्षेत्रातील विकास कामामध्ये यापुढे कुठलाही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसून अधिकाऱ्यांच्या उदासिन धोरणामुळे कामे खोळबंल्यास संबंधित अधिकाऱ्यावर स्वत: कारवाई करणार असल्याचे खा. तडस यावेळी म्हणाले. सदर बैठकीमध्ये प्रामुख्याने खासदार विकास निधी, राज्य सरकारकडून मंजूर असलेली अर्थसंकल्पीय कामे, केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत असलेली कामे, सांसद आदर्श ग्राम तरोडा, जिल्हा नियोजन समिती अंतर्गत येणारी कामे आदी कामांचा आढावा त्यांनी घेतला. शासकीय यंत्रणांनीही योग्य वेळेत व विहित मुदतीमध्ये विकासनिधी खर्च करावा व आलेले प्रस्ताव त्वरित मार्गी लावाव्या, अशा सूचना खा. तडस यांनी केल्या. यावेळी प्रामुख्याने प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी गजभिये, मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, सा.बां. विभागाचे कार्यकारी अभियंता चौधरी, आर्वी सा. बां. वि. भाष्करवार, शाखा अभियंता येळणे, जिल्हा परिषदेचे प्रतिनिधी शाखा अभियंता निखार, नियोजन विभागाचे धोटे, चकाटे, शाखा अभियंता न.प.चे फरसोले तसेच तांदळे, जोशी उपस्थित होते.‘सांसद आदर्श ग्राम योजना’ अंतर्गत कारंजा तालुक्यातील नव्याने दत्तक घेतलेले गाव ‘पार्डी’ या गावाचा सविस्तर आराखडा सादर करण्यात आला. पार्डी गावाचा नियोजनबद्ध विकास करावा व जनजागृतीच्या माध्यमातून आदर्श गावाची चळवळ उभी राहावी याकरिता खा. तडस यांच्या सूचनेनुसार येत्या काही दिवसात जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार्डी गावामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या माध्यमातून सर्व लोकामध्ये नुकतीच जनजागृती होईल व आदर्श गाव संकल्पनेचा शुभारंभ या माध्यमातून होईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.केंद्र व राज्य शासनाच्या सर्व लोकोउपयोगी योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याकरिता अधिकाऱ्यांनी युद्धस्तरावर प्रयत्न करण्याचे गरजेचे आहे व गरजू लोकांपर्यंत अधिकारी व कर्मचारी यांनी केंद्र व राज्यशासनाला योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याकरिता सहकार्य करावे, अश्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.(शहर प्रतिनिधी)