शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभाग टाकतेय कात; करण्यासाठी कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 05:00 IST

आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात मागील वर्षी कोविड विलगीकरणासाठी दहा बेड होते. पण, आता तीस ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. पूर्वी एक व्हेंटिलेटर होते मात्र ते जिल्हा शल्यचिकित्सकांच्या निर्देशानुसार सावंगी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. त्यामुळे येथे आता व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध नाहीत. ऑक्सिजन कॉन्सट्रेटरमध्ये सहाची भर पडली असून त्याची संख्या आठ झाली आहे.

ठळक मुद्देउपजिल्हा रुग्णालयाची धडपड : सुविधांसोबत मनुष्यबळातही वाढ

राजेश सोळंकीलोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण आर्वी तालुक्यातील हिवरातांडा या गावात आढळून येताच जिल्हा प्रशासनाचे लक्ष या तालुक्याकडे लागले होते. या तालुक्यापासूनच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांना अधिकगती देण्यात आली. कोरोनाच्या पहिल्या लाटीपेक्षा दुसऱ्या लाटीने चांगलेच थैमान घातल्याने दुर्लक्षित असलेली आरोग्य यंत्रणाही सुसज्ज करण्यावर भर देण्यात आला. आता तिसऱ्या लाटीची शक्यता वर्तविली जात असल्याने ती रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेला आणखी बळ देण्याचे काम सुरु आहे.आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात मागील वर्षी कोविड विलगीकरणासाठी दहा बेड होते. पण, आता तीस ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. पूर्वी एक व्हेंटिलेटर होते मात्र ते जिल्हा शल्यचिकित्सकांच्या निर्देशानुसार सावंगी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. त्यामुळे येथे आता व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध नाहीत. ऑक्सिजन कॉन्सट्रेटरमध्ये सहाची भर पडली असून त्याची संख्या आठ झाली आहे. पहिल्या लाटीत रुग्णाच्या विलगीकरणासाठी हैबतपूर आणि पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये ८० बेडची व्यवस्था करण्यात आली होती. आता रुग्ण गृहविलगीकरणात अधिक असल्याने तेथे वीस बेडचीच व्यवस्था आहे. विशेषत: पूर्वी आरोग्य सेवा देण्यासाठी आठ डॉक्टर ४७ कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ होते. त्यात पाच कंत्राटी डॉक्टर आणि ९ आरोग्य कर्मचाऱ्यांची भर पडली असून सध्या ५६ मनुष्यबळ आरोग्य सेवेत आहे. ग्रामीण भागातील जळगाव, रोहणा व खरांगणा या प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिस्थितर जैसे थेच असून केवळ ऑक्सिजन कॉन्सट्रेटरची वाढ झाली आहेत.

आता काय असणार व्यवस्था

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी आता पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये सुसज्ज कोविड हॉस्पिटल सुरु होणार आहे. उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटर तेथे हलविण्यात येणार असून रेमिडीसर ऑक्सिजन, आरटीपीसीआर चाचणी, अ‍ॅन्टिजेन चाचणी यासह इतर रक्त तपासण्या त्या ठिकाणी होणार आहे. उपजिल्हा रुग्णालयात फक्त नॉन कोविड सेंटर राहणार आहे, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोहन सुटे यांनी दिली.यासोबतच आर्वीमध्ये कोरोनावर उपचार करण्याकरिता खासगी रुग्णालयही सुुरु करण्यात आले असून हे रुग्णालयही याकरिता मदतगार ठरणार आहे. यासोबतच रुग्णांची संख्या लक्षात घेऊन त्यांच्या विलगीकरणाकरिता कोविड केअर सेंटरचीही व्यवस्था करण्यासाठी प्रशासन पूर्णत: तयारीमध्ये आहेत. त्यामुळे रुग्णासाठी यंत्रणा उभी होत असल्याचे दिसून येत आहे.

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या