शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन काळात १२.५० टक्क्यांनी वाढली विजेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 05:00 IST

मागीलवर्षीपासून देशभरासह राज्यात आणि जिल्ह्यात कोरोना संसर्गाने कहर केला. या पार्श्वभूमीवर तब्बल चार ते पाच महिने लॉकडाऊन करण्यात आले होते. या कालावधीत बाजारपेठेतील सराफा, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुकाने, कापड आदी सर्वच दुकाने ठप्प होती तर दुसरीकडे कुलरमुळे कोरोना संसर्गाचा फैलाव होत असल्याची अफवा पसरल्याने भर उन्हाळ्यात कुलरच्या वापरावरही अनेकांनी बंदी घातली होती. त्यामुळे २०१९ च्या तुलनेत विजेची मागणी ४० टक्क्यांनी घटली होती.

ठळक मुद्देगतवर्षी ४० टक्क्यांनी घटली : लॉकडाऊनमुळे मागणीत झाली होती घट, शहरातील ३४ हजार ५०० ग्राहकांकडून होतोय नित्य वापर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदाही कडक लॉकडाऊन करण्यात आले असले तरी मागीलवर्षीच्या तुलनेत वर्धा शहरात विजेची मागणी १२.५० टक्क्यांनी वाढल्याची माहिती वीज महावितरण कंपनीच्या सूत्रांनी दिली.मागीलवर्षीपासून देशभरासह राज्यात आणि जिल्ह्यात कोरोना संसर्गाने कहर केला. या पार्श्वभूमीवर तब्बल चार ते पाच महिने लॉकडाऊन करण्यात आले होते. या कालावधीत बाजारपेठेतील सराफा, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुकाने, कापड आदी सर्वच दुकाने ठप्प होती तर दुसरीकडे कुलरमुळे कोरोना संसर्गाचा फैलाव होत असल्याची अफवा पसरल्याने भर उन्हाळ्यात कुलरच्या वापरावरही अनेकांनी बंदी घातली होती. त्यामुळे २०१९ च्या तुलनेत विजेची मागणी ४० टक्क्यांनी घटली होती. वर्धा शहरात ३४ हजार ५०० वीज ग्राहकांची संख्या आहे. २०१९ मध्ये एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात केवळ शहरात १४०९ अ‍ॅम्पियर म्हणजे २७.१० मेगावॅट इतका वीजपुरवठ्यापोटी वीज महावितरणवर भार होता तर २०२० मध्ये (८६७ अ‍ॅम्पियर) १६.६७ इतका कमी भार होता. लॉकडाऊनमुळे विजेचा व्यावसायिक, औद्योगिक वापर बंद होता. ग्राहकांकडून उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात होणारी विजेची मागणीही घटल्याने १० मेगावॅट भार गतवर्षी कमी झाला. यंदाही मार्च महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले. एप्रिल महिन्यांत काेरोनाबाधित रुग्ण आणि मृत्यूसंख्येचा आलेख चढताच राहिला. यामुळे लॉकडाऊनअंतर्गत कडक निर्बंध घालण्यात आले. ८ पासून ३१ मेपर्यंत बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. त्यामुळे या काळात विजेची व्यावसायिक मागणी केवळ कमी होती. मात्र, गतर्षीच्या तुलनेत व्यावसायिक, औद्योगिक आणि घरगुती विजेची मागणी नोंदविण्यात आली.

गतवर्षी कोरोनामुळे कडक लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे औद्योगिक, व्यावसायिक इतकेच नव्हे, तर घरगुती विजेची मागणी घटली होती. यंदाही लॉकडाऊन करण्यात आले. मात्र, ते मर्यादित कालावधीसाठी राहिल्याने विजेची मागणी गतवर्षीच्या तुलनेत जादा राहिली.-नरेश पारधी, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, वीज महावितरण कंपनी.

 

टॅग्स :electricityवीज