शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्तीत ‘आधार’ ठरतेय अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 06:00 IST

शासनाने प्रायोगित तत्त्वावर कर्जमुक्तीची पहिली यादी जाहीर करीत वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्याच्या लोणी आणि कारंजा (घा.) तालुक्याच्या येणगाव अशा दोन गावातील १६६ शेतकऱ्यांची नावे जाहीर केली. यापैकी १५४ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण झाले असून ८ शेतकºयांचे आधार क्रमांक चुकीचे आहेत. तर चार शेतकरी मृत असल्याचे निदर्शनास आले आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांपुढे नवी अडचण : दुसऱ्या यादीत ४६ हजार ४२४ शेतकऱ्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य सरकारने महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजना जाहीर केली असून या योजनेतील लाभार्थी शेतकºयांच्या दोन याद्या जाहीर झाल्या आहे. पहिल्या यादीत १६६ तर दुसऱ्या यादीमध्ये ४६ हजार ४२४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. पहिल्या यादीतील आठ शेतकऱ्यांचे आधार क्रमांक चुकीचे असून चार शेतकरी मृत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीच्या लाभाकरिता आधारच अडसर ठरताना दिसत आहे.शासनाने प्रायोगित तत्त्वावर कर्जमुक्तीची पहिली यादी जाहीर करीत वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्याच्या लोणी आणि कारंजा (घा.) तालुक्याच्या येणगाव अशा दोन गावातील १६६ शेतकऱ्यांची नावे जाहीर केली. यापैकी १५४ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण झाले असून ८ शेतकºयांचे आधार क्रमांक चुकीचे आहेत. तर चार शेतकरी मृत असल्याचे निदर्शनास आले आहे. या यादीतील ११२ शेतकऱ्यांच्या खात्यात १ कोटी ५ लाख ९४ हजार रुपये जमा करण्यात आले आहे. आता आधार अपडेट करण्यासाठी शेतकऱ्यांची फरपट होत असल्याने त्यांना अद्याप कर्जमुक्तीचा लाभ मिळू शकला नाही. या योजनेमध्ये जिल्ह्यात ६१ हजार ८४ शेतकरी पात्र असून त्यातील ५७ हजार ७३३ शेतकरी आधार धारक आहे. यापैकी ४६ हजार ५९० शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली असून दोन्ही यादीनंतर अद्याप ११ हजार १४३ शेतकरी प्रतिक्षेत असल्याची माहिती जिल्हा निबंधक कार्यालयाकडून मिळाली आहे. दुसºया यादीतील शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणिकरणाचा अडथळा कायमच आहे. काहींनी आधार क्रमांकात दुरुस्ती केल्यानंतरही योजनेच्या सर्व्हरवर दुरुस्ती आधार क्रमांक कोण अपलोड करेल, ही नवी अडचण निर्माण झाल्याने हे शेतकरी अद्याप कर्जमुक्तीच्या लाभापासून वंचित आहे.पहिल्या यादीतील आठ शेतकऱ्यांच्या बँक केवायसी व आधार क्रमांकामध्ये तफावत असल्याचे आधार प्रमाणिकरणादरम्यान समोर आले आहे. त्यांच्या आधारमध्ये दुरुस्तीचे काम करण्यात आले पण, योजनेच्या सर्व्हरवर दुरुस्ती आधार क्रमांक कोण अपलोड करेल, याबाबत शासनस्तरावर चर्चा सुरु आहे.- गौतम वालदे, जिल्हा निबंधक.नवीन कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या यादीत माझे वडील कवडू सपाट यांचे नाव आले आहे. योजनेच्या लाभासाठी आधार प्रमाणिकरण करताना त्यांच्या हाताचा अंगठा आवश्यक आहे. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याने प्रशासनाने वारसदार चढवायला सांगितले. वारसदार चढवूनही अद्याप लाभ मिळाला नाही.- गणेश सपाट, शेतकरी रा. लोणी.माझ्याकडे तीन एकर शेती असून २०१८ मध्ये ८० हजार रुपयाचे कर्ज घेतले होते. सततची नापिकी असल्याने कर्जाची परतफे ड करता आली नाही. या कर्जमुक्ती योजनेत नाव आलं मात्र, आधारच्या घोळाने अद्यापही कर्जमुक्तीचा लाभ मिळू शकला नाही.- रवींद्र कासार, शेतकरी, रा. लोणी.

टॅग्स :Farmerशेतकरी