शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शतकाच्या झंझावातात मृत्यूचा आलेख वाढताच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 05:00 IST

जिल्ह्यामध्ये लॉकडाऊच्या काळात दीड महिना कोरोनाला एन्ट्री मिळाली नाही. त्यानंतर १० मे रोजी कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर गाफील नागरिकांमुळे कोरोनाने साखळी मजबूत करायला सुरुवात केली. बघता-बघता दर दिवसाला आठ ते दहा रुग्णाची सरासरी पन्नासपार गेली. सप्टेंबर महिन्यामध्ये अपवाद वगळता दरदिवसाला शंभरावर रुग्ण आढळून येत आहे. रविवारलाही एकाच दिवशी ११५ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देकोरोनास्थिती : रविवारी ११५ रुग्ण, तिघांचा झाला मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शिथिलतेनंतर नागरिकांनी फारसे मनावर घेतले नसल्याची संधी साधून कोरोनाने आपली धुव्वाधार बॅटींग सुरु केली आहे. अपवाद वगळता दररोजच शंभरावर कोरोनाबाधित आढळून येत आहे. यासोबतच मृत्यूंच्या संख्येतही वाढत होत असल्याने वर्धेकरांच्या चिंतेत आणखीच भर पडली आहे. कोरोेनाची वाढती संख्या आणि रुग्णालयामध्ये खाटांची असलेली कमतरता लक्षात घेता नागरिकांनी बेभान वागणुकीला बे्रक लावण्याची गरज निर्माण झाली आहे.जिल्ह्यामध्ये लॉकडाऊच्या काळात दीड महिना कोरोनाला एन्ट्री मिळाली नाही. त्यानंतर १० मे रोजी कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर गाफील नागरिकांमुळे कोरोनाने साखळी मजबूत करायला सुरुवात केली. बघता-बघता दर दिवसाला आठ ते दहा रुग्णाची सरासरी पन्नासपार गेली. सप्टेंबर महिन्यामध्ये अपवाद वगळता दरदिवसाला शंभरावर रुग्ण आढळून येत आहे. रविवारलाही एकाच दिवशी ११५ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ३ हजार ३९० झाली आहे.यापैकी १ हजार ६३३ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या १ हजार ६६८ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोनाची वाढती रुग्ण संख्या आणि रुग्णालयातील सुविधांची उपलब्धता, यामुळे आतापर्यंत ८८ कोरोनाबाधितांना आपला जीव गमवावा लागला. रविवारी तीन रुग्णांचा मृत्यू झाला असून यामध्ये समुद्रपूर व वर्धा येथील पुरुषांचा तर पुलगावच्या महिलेचा समावेश आहे.जिल्ह्यातील ५३ रुग्ण झाले कोरोनामुक्तजिल्ह्यात आतापर्यंत ३० हजार ७९५ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी ३० हजार ७४६ व्यक्तींचा अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी २७ हजार ००६ व्यक्तींना अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे ३ हजार ३९० कोरोनाबाधित आढळून आले आहे. अद्याप ३९ अहवाल प्रलंबित असून रविवारी पुन्हा ४३९ व्यक्तीचे नमुने तपासणीकरिता पाठविले आहे. कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असून बरे होणाऱ्यांचेही प्रमाण मोठे आहे. आज ५३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना कोरोनामुक्त करण्यात आले. आतापर्यंत १ हजार ६३३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या १ हजार ६६८ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून ते गृह अलगीकरणात किंवा रुग्णालयात उपचार घेत आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याDeathमृत्यू