शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

मेंढपाळांना आले सुगीचे दिवस

By admin | Updated: May 15, 2014 01:42 IST

जिल्ह्यात राजस्थानी मेंढपाळ अवतरले आहेत. आंजी (मोठी) परिसरातही शेतीची सुपिकता वाढण्यासाठी शेतकरी विविध युक्त्या शोधत असल्याचे दिसते.

४0 टक्के शेतकर्‍यांची कामे आटोपलीजमिनीची सुपिकता वाढविण्याचा प्रयत्न : मेंढय़ा बसविण्याचे एका रात्रीचे दर दीड हजार रुपयेवर्धा : जिल्ह्यात राजस्थानी मेंढपाळ अवतरले आहेत. आंजी (मोठी) परिसरातही शेतीची सुपिकता वाढण्यासाठी शेतकरी विविध युक्त्या शोधत असल्याचे दिसते. नापिकीवर मात करण्यासाठी शेतात राजस्थानी शेळ्या, मेंढय़ा बसवून शेतीची सुपिकता वाढविण्यासाठी शेतकरी प्राधान्य देत असल्याचे दिसते. शेतात मेंढय़ा बसविण्यासाठी शेतकर्‍यांना एका दिवसाचे दीड हजार रुपये मोजावे लागत आहेत.परिसरातील ७0 टक्के शेतकर्‍यांकडे दोन बैलांच्या वर जनावरे नाही. यामुळे त्यांना पूरेशा प्रमाणात शेणखत उपलब्ध होत नाही. दिवसेंदिवस रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीची पोत खालावत आहे. शेती नापिक होण्याच्या मार्गावर आहे. रासायनिक खताचे भाव गगनाला भिडल्याने ते खरेदी करणे कठीण जात आहे. शेतकर्‍यांची आर्थिक बाजू कमकुवत आहे. पर्यायाने शेतकरी कर्जबाजारी झाला असून अनेकांनी आत्महत्या केल्यात. यामुळे बरेच शेतकरी आता रासायनिक खताचा वापर कमी करून सेंद्रिय खताकडे वळले आहेत; पण त्यासाठी शेणखत वापरणे आवश्यक आहे. शेतकरी शेणखताकडे वळल्याने शेणखताचेही दर चांगलेच वधारलेत. उन्हाळ्यात अनेक शेतकरी शेणखत बैलबंडी वा ट्रॅक्टरच्या हिशेबाप्रमाणे खरेदी करतात; पण लहान शेतकर्‍यांना ते अशक्य आहे. यामुळे शेतकरी आपल्या शेतात शेळ्या, मेंढय़ा बसविण्यास प्राधान्य देत आहे. यामुळे शेतीची सुपिकता वाढण्यास मदत होते. शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त आहेत. काहींच्या शेतात ट्रॅक्टरद्वारे नांगरणी, वखरणी सुरू असल्याचे दिसते.(स्थानिक प्रतिनिधी)

४0 टक्के शेतकर्‍यांची कामे आटोपली

■ जवळपास ४0 टक्के शेतकर्‍यांची नांगरणीची कामे झाली आहेत. दरवर्षी एप्रिल महिन्यात राजस्थानी मेंढपाळ परिसरात डेरेदाखल होतात.■ शेतकर्‍यांच्या शेतात मेंढय़ांचा कळप बसवितात. मेंढय़ांना चारा व मालकांना पैसेही मिळतात.■ एका रात्री मेंढय़ा बसविल्यास त्यांना दीड हजार रुपये मिळतात. सुपिकता वाढविण्यासाठी शेतात मेंढय़ा बसविण्यासच शेतकरी पसंती देताना दिसतात.