शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सिलिंडर, ग्राहकांना वेटींगच!

By admin | Updated: October 30, 2014 22:56 IST

ऐन दिवाळीच्या पर्वावर जिल्ह्यात सर्वत्र गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला होता़ या टंचाईच्या काळातही व्यावसायिकांना सुरळीत सिलिंडर मिळत असल्याचे लक्षात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़

वर्धा : ऐन दिवाळीच्या पर्वावर जिल्ह्यात सर्वत्र गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला होता़ या टंचाईच्या काळातही व्यावसायिकांना सुरळीत सिलिंडर मिळत असल्याचे लक्षात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़ व्यावसायिक सिलिंडर उपलब्ध आणि घरगुती नाही, हा प्रकार अनेकांना समजला नाही़ गॅसवर वाहने चालविणाऱ्या वाहन चालकांनाही घरगुती सिलिंडर सहज उपलब्ध झाल्याने ग्राहकांत असंतोष दिसून येत आहे़ ग्राहकांना गॅस घ्यायचे म्हटले की, दोन आठवड्यासाठी वेटींग करावी लागते; पण व्यावसायिकांना काळ्या बाजारातून केवळ एका फोनवर सिलिंडर घरपोच मिळत असल्याचा अनुभव टंचाईच्या काळातही सामान्य ग्राहकांनी घेतला़ या प्रकारामुळे नागरिक बुचकळ्यात पडले होते़ वर्धा जिल्ह्यात सुमारे तीन लाखांहून अधिक अधिक ग्राहक आहेत. यातील ५० टक्के ग्राहकांना ३ ते ४ महिन्यांत केवळ एकदाच गॅस सिलिंडर मिळत आहे़ गॅस धारकाला वर्षाला १२ सिलिंडर अनुदानात मिळतात; पण त्यांना एवढे सिलिंडर लागत नसल्याने उर्वरित सिलिंडर एजन्सीकडून काळ्या बाजारात विकले जातात़ ग्राहकांनी सिलिंडरची बुकिंग केल्यानंतर त्यांना सिलिंडर मिळविण्यासाठी तब्बल १५ दिवसांची वेटींग करावी लागत आहे. उलट काळ्या बाजारातून हे गॅस सिलिंडर व्यावसायिकांना पुरविले जात असल्याचा आरोप ग्राहकांतून केला जात आहे. घरपोच सिलिंडर मिळविण्यासाठी ग्राहकांची अनेकवेळा ससेहोलपट होते; पण त्यांना ते मिळत नाही. व्यावसायिक लोकांनी एक फोन केला की, दुसऱ्या मिनिटाला सिलिंडर दुकानासमोर हजर होते. यावरून संबंधित विभागाला सर्वसामान्य ग्राहकांची किती काळजी आहे, हे स्पष्ट होते़ चढ्या भावाने का होईना पण लवकर सिलिंडर उपलब्ध होत असल्याने व्यावसायिकही अधिक मागणी करीत असल्याचे दिसते़ या मनमानी कारभारामुळे ग्राहक वैतागले आहेत.गॅस कनेक्शनमध्येही ग्राहकांची लूट केली जात असून पावतीवर दाखविलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम घेतली जात असल्याचा आरोगप ग्राहक करताहेत़ याबाबत तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने ग्राहकांत असंतोष पसरला आहे़(कार्यालय प्रतिनिधी)