केळझरमध्ये तीन दिवस राहणार संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 05:00 AM2020-08-07T05:00:00+5:302020-08-07T05:00:39+5:30

गावातील डॉक्टर असलेला ५९ वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आला आहे. या व्यक्तीचा गावातच खासगी दवाखाना आहे. या व्यक्तीची चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रुग्ण राहत असलेला परिसर प्रतिबंधित केला. तसेच येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या डॉ. छाडी व त्यांच्या चमुने कोरोनाबाधिताच्या दवाखान्यात १ ऑगस्ट ते ५ ऑगस्टदरम्यान उपचाराकरिता आलेल्या १०५ व्यक्तींचा शोध सुरु केला आहे.

Curfew will remain in Keljar for three days | केळझरमध्ये तीन दिवस राहणार संचारबंदी

केळझरमध्ये तीन दिवस राहणार संचारबंदी

Next

केळझर : येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाकडून खबरदारी म्हणून शनिवारपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. या कालावधीत दुधवाटप, वृत्तपत्र वाटप, वैद्यकीय सुविधा, औषधी दुकाने, अत्यावश्यक सेवेतील शासकीय कार्यालये सुरु राहतील. तसेच वैद्यकीय कारणाशिवाय खासगी वाहने कोणत्याही कारणाशिवाय फिरणार नाहीत, असे आदेश उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी निर्गमित केले आहेत.
गावातील डॉक्टर असलेला ५९ वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आला आहे. या व्यक्तीचा गावातच खासगी दवाखाना आहे. या व्यक्तीची चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रुग्ण राहत असलेला परिसर प्रतिबंधित केला. तसेच येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या डॉ. छाडी व त्यांच्या चमुने कोरोनाबाधिताच्या दवाखान्यात १ ऑगस्ट ते ५ ऑगस्टदरम्यान उपचाराकरिता आलेल्या १०५ व्यक्तींचा शोध सुरु केला आहे. तहसीलदार महेंद्र सोनोने व ठाणेदार सुनिल गाठे यांच्या निर्देशानुसार स्थानिक वैद्यकीय कर्मचारी आशा वर्कर, ग्रामपंचायत प्रशासन, पोलीस पाटील आणि पोलीस कर्मचारी विशेष लक्ष ठेवून आहेत.

Web Title: Curfew will remain in Keljar for three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.