शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

निकृष्ट सिमेंट खांब; वीज वाहिनीला धोका

By admin | Updated: February 4, 2015 23:19 IST

ग्रामीण भागातील वीज जोडणीसाठी व वाहिनी टाकण्यासाठी लोखंडीऐवजी सिमेंटचे खांब उभारणे सुरू आहे; पण या खांबांचा दर्जा निकृष्ट आहे. शिवाय जमिनीमध्ये खोलवर खांब गाडले जात

अमोल सोटे - आष्टी (श़)ग्रामीण भागातील वीज जोडणीसाठी व वाहिनी टाकण्यासाठी लोखंडीऐवजी सिमेंटचे खांब उभारणे सुरू आहे; पण या खांबांचा दर्जा निकृष्ट आहे. शिवाय जमिनीमध्ये खोलवर खांब गाडले जात नसल्याने या प्रवाहित वीजवाहिन्या नागरिकांच्या जीवावर उठल्या आहेत़ वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे़ आर्वी विभागांतर्गत, आर्वी, आष्टी, कारंजा, खरांगणा, पुलगाव असे उपविभाग आहे. या सर्व विभागात नवीन व जुन्या वीज वाहिन्या दुरूस्तीचे काम धडाक्यात सुरू आहे. यासाठी सिमेंटचे खांब वापरले जात आहे. खांबांमध्ये सळाखी कमी आणि गिट्टी अधिक असल्याने अनेक खांब अर्ध्यातून तुटत आहेत़ काही ठिकाणी ते वाकल्याचे दिसते़ जमिनीत खोलवर खोदून त्यात मजबूत व दर्जेदार काँक्रीट ५ फुटापर्यंत करावे लागते. संबंधित यंत्रणा अवघ्या दीड फुटाचे काँक्रीट करून खांब गाडत आहे. यात लाखो रुपयांचा गैरप्रकार होत आहे. या कामाची सर्व बिले मुकाट्याने पारित होतात, हे विशेष! आर्वी विभागातील बेताल व भोंगळ कारभार निकृष्ट कामांना मुकसंमती देत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. आष्टी तालुक्यातील साहूर, अंतोरा परिसरात सर्वाधिक बोगस काम दिसून येते़ आर्वी तालुक्यातील वाठोडा पुनर्वसन लगतच्या भागातील लाखो रुपयांचे काम संशयाच्या भोवऱ्यात आहे. वीज वितरण कंपनी अस्तित्वात नसलेल्या कामांची नोंद मोजमाप पुस्तिकेत करीत आहे. यात तांत्रिक तपासणी विभागातील एक कनिष्ठ अभियंता पार्टनर असल्याची चर्चा आहे. वरिष्ठ पातळीवर चौकशीची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तक्रारीला केराची टोपली दाखविण्याचे काम संबंधित अधिकारी करीत असून योजनांची वाट लावत आहे़