शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसमोर पीक बदलाचे संकट

By admin | Updated: July 2, 2014 23:24 IST

बी-बियाणे खते इत्यादींची खरेदी करून शेती पेरणी योग्य तयार केल्यावर पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर पीक बदलाचे संकट निर्माण झाले आहे. येत्या ५-६ दिवसात पाऊस न आल्यास कोणते

पिंपळखुटा: बी-बियाणे खते इत्यादींची खरेदी करून शेती पेरणी योग्य तयार केल्यावर पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर पीक बदलाचे संकट निर्माण झाले आहे. येत्या ५-६ दिवसात पाऊस न आल्यास कोणते पीक पेरावे याचा विचार शेतकरी करीत असून दिवसेंदिवस त्यांची चिंता वाढत आहे.गत वर्षी २५ मे ते २५ जून या काळात १८ दिवस सतत पाऊस आला. मात्र यावर्षी यारदम्यान केवळ २ दिवस पाऊस आला. त्यात बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरणी केली. पण आता त्यांच्यावर दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. मागील वर्षी अतिवृष्टी व गारपीटीच्या तडाख्यात सापडलेल्या शेतकऱ्यांची यंदाही आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. पाऊस येणार या अपेक्षेने काही शेतकऱ्यांनी पेरणी केली. परंतु पावसाने दडी मारल्यामुळे आता शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. सोयाबीनची वेळ निघून गेली असून कपाशीची वेळही निघून जात आहे. त्यामुळे आता कोणते पीक पेरावे या विवंचनेत शेतकरी आहे. ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे त्यांनी पिकाला जीवदान दिले. मात्र इतरांचे बियाणे अजूनही माती आड आहे. किमान ६५ मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असे कृषी विभाग सांगत असला तरी आधीच लांबलेली पेरणी शेतकऱ्यांनी पावसाची वाट न पाहता केली. यंदा सोयाबीन बियाण्यांचे वाढलेले भाव व बियाण्यांच्या उगवण क्षमतेची खात्री नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाचे क्षेत्र वाढविले होते. मात्र पाऊस लांबल्याने पुन्हा काय पेरावे या विचारात शेतकरी आहे.गत वर्षी पावसामुळे खराब झालेल्या जनावरांचा चारा शेतकऱ्यांनी साठवून ठेवला होता. नाईलाजाने जनावरांना तो चारा खावा लागला. परंतु पावसाच्या विलंबामुळे नवीन चारा उगवण्या आधीच गोठ्यातील चारा संपल्याने शेतकऱ्यांसमोर चाऱ्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. जनावरांना कसे जगावावे हा प्रश्न निर्माण झाला आहे. आधीच आर्थिक टंचाईत असलेला शेतकरी जनावरांकरिता चारा विकत घेवू शकत नाही. त्याकरिता शासनाने शेतकऱ्यांना मदत देणे गरजेचे आहे. पावसाच्या विलंबाचा मजुरांनाही फटका बसला आहे. शेतीचे काम बंद असल्यामुळे मजूर सध्या घरीच असल्याचे दिसत आहे.(वार्ताहर)