शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

श्रमदानातून ट्रामा केअर युनिटमध्ये विलगीकरण कक्षाची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 05:00 IST

सद्या स्थितीत स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध विलगिकरण कक्षात १० साधे तर ५ बेड अतिदक्षता विभागासाठी आहेत. शिवाय दोन व्हेंटिलेटर आहे. परंतु, कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे दक्षता म्हणून आणखी एकूण ३५ खाटांचे महिला व पुरुषांसाठी वेगवेगळे दोन विलगिकरण कक्ष अडगळीत पडलेल्या चांगल्या इमारतीत किळकोळ डागडुजी करून करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : येथील उपजिल्हा रुग्णालयातील अद्याप लोकार्पण न झालेल्या ट्रामा केअर युनिट मध्ये १५ खाटांच्या अद्यावत विलगिकरण कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. १५ खाटांच्या दोन कक्षांच्या किरकोळ डागडुजीची कामे कासवगतीने सुरु आहे. कोरोनाबाबतचा संभाव्य धोका लक्षात घेऊन याच रुग्णालयातील ट्रामा केअर युनिट मध्ये श्रमदानातून विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे.सद्या स्थितीत स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध विलगिकरण कक्षात १० साधे तर ५ बेड अतिदक्षता विभागासाठी आहेत. शिवाय दोन व्हेंटिलेटर आहे. परंतु, कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे दक्षता म्हणून आणखी एकूण ३५ खाटांचे महिला व पुरुषांसाठी वेगवेगळे दोन विलगिकरण कक्ष अडगळीत पडलेल्या चांगल्या इमारतीत किळकोळ डागडुजी करून करण्यात येत आहे. ही इमारत उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य इमारतीचाच मागील भाग आहे. सद्याच्या लॉकडाऊनच्या स्थितीत यासाठी लागणारे साहित्य उपलब्ध होणे कठीण बाब ठरत आहे. अशा परिस्थिती डॉक्टर, परिचारिका, कक्ष परिसेवक आदींनी श्रमदान करून ट्रामा केअर युनिटला स्वच्छ व निजंर्तुक केले. तसेच ५० लोखंडी बेडची रंगरंगोटी केली. नगदी शिवाय साहित्य द्यायला कोणीच तयार नाही त्यामुळे उसनवारी करून जवळपास सव्वा लाखांची जुळवाजुळव करून काम केल्याचे अधीक्षक डॉ. किशोर चाचरकर म्हणाले. दोन कक्षांच्या निर्मिती नंतर येथील अद्ययावत विलगिकरण कक्षात एकूण ५० खाटा उपलब्ध होणार आहे हे विशेष.उपजिल्हा रुग्णालयातील इमारतीची डागडुजीचे किरकोळ कामे विविध कारणांमुळे प्रलंबित आहेत. तरी येत्या आठ दिवसांत प्रलंबित कामे पूर्ण करण्यात येईल.- दिलीप कुटे, उपविभागीय अभियंता, सा. बां. हिंगणघाट.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटल