शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
3
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
4
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
5
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
6
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
7
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
8
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
9
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
10
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
11
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
12
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
13
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
14
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
15
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
16
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
18
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
19
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
20
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-मुंबई रेल्वेमार्गाला तडे; वाहतूक दोन तास प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 15:26 IST

मध्य रेल्वेच्या नागपूर-मुंबई या रेल्वे मार्गावरील ट्रॅकला तुळजापूर-दहेगावनजीक तडे गेल्याचे सोमवारी सकाळी आढळून आले.

ठळक मुद्देदहेगाव-तुळजापूर मार्गावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: मध्य रेल्वेच्या नागपूर-मुंबई या रेल्वे मार्गावरील ट्रॅकला तुळजापूर-दहेगावनजीक तडे गेल्याचे सोमवारी सकाळी आढळून आले. सदर घटना वेळीच लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला. असे असले तरी या मार्गावरील रेल्वे वाहतूक काही तासांकरिता खोळंबली होती. माहिती मिळताच ब्रेक डाऊन चमूने घटनास्थळ गाठून दुरूस्तीचे काम युद्धपातळीवर पूर्ण केले. त्यानंतर या मार्गवरील रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यात आली.तुळजापूर परिसरात रेल्वे रुळाला तडे गेल्याचे लक्षात येताच दुरूतीची जबाबदारी असलेल्याने चमूला पाचारण करण्यात आले. दुरूस्तीचे काम पूर्णत्त्वास जाण्यास सुमारे दीड तासांच्यावर कालावधी लागल्याने विदर्भ एक्स्प्रेससह अन्य महत्त्वाच्या रेल्वे गाड्या दोन तास उशीराने धावल्या. ट्रॅक फॅक्चर झाल्याची माहिती मिळताच ब्रेक डाऊन चमूला पाचारण करण्यात आले. रेल्वे वाहतूक खोळंबल्याने याचा नाहक त्रास शाळकरी मुला-मुलींसह नोकरीसाठी जाणाऱ्या तसेच विविध कामानिमित्त नियोजित ठिकाणी जाणाºया प्रवाशांना सहन करावा लागला. ट्रॅक फॅक्चर झाल्याचा फटका विदर्भ एक्स्प्रेससह हावडा मेल, नागपूर-पूणे, नागपूर-अमरावती इंटरसिटी, आझाद हिंद एक्स्प्रेस, प्रेरणा एक्स्प्रेस यासह काही अन्य रेल्वे गाड्यांनाही बसला.हा ट्रॅक फॅक्चर होण्याचे नेमके कारण अद्यापही कळलेले नाही. त्याच्या कारणांचा शोध घेतल्या जात आहे. सध्या रेल्वे वाहतूक सुरळीत आहे. असे असले तरी काही गाड्या उशिराने धावत आहेत.- अनिल वालदे, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, नागपूर.

 

 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे