शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

३० हजार ५०० हेक्टरमध्ये होणार कपाशीची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 05:00 IST

चालू आठवड्यात देवळी तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने रविवारी सायंकाळी तर गुरुवारी दोन दिवस जोरदार हजेरी लावली. रोहिणी नक्षत्रात बरसलेल्या पूर्व मौसमी पावसाने बळीराजा सुखावल्यामुळे पेरणीपूर्व मशागतीच्या कामासाठी शिवारात लगबग वाढली आहे. ऊन-सावल्यांच्या खेळात आभाळाच्या छताखाली बळीराजा दिवस उजाडल्यापासून मावळेपर्यंत घाम गाळताना दिसत आहे.

ठळक मुद्देसोयाबीनच्या क्षेत्रात घट; तुरीची पेरा वाढणार

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : रोहिणी नक्षत्राच्या पावसानंतर शेतकरी खरिपाच्या तयारीला लागला आहे. अनेक संकटांची टांगती तलवार डोक्यावर घेऊन शेतकरी पुन्हा नव्या जोमाने तयारीला लागला आहे. देवळी तालुक्यात सुमारे ५८  हजार ३० हेक्टर खरिपाचे लागवड क्षेत्र आहे. त्यापैकी या हंगामात ३० हजार ५००  हेक्‍टरमधे कापूस लागवड केली जाणार आहे. तर १८  हजार  २५०  हेक्टर सोयाबीन आणि ९ हजार  २५०  हेक्‍टरमध्ये तूर लागवड तर उर्वरित क्षेत्रात इतर पीक लागवडीचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.चालू आठवड्यात देवळी तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने रविवारी सायंकाळी तर गुरुवारी दोन दिवस जोरदार हजेरी लावली. रोहिणी नक्षत्रात बरसलेल्या पूर्व मौसमी पावसाने बळीराजा सुखावल्यामुळे पेरणीपूर्व मशागतीच्या कामासाठी शिवारात लगबग वाढली आहे. ऊन-सावल्यांच्या खेळात आभाळाच्या छताखाली बळीराजा दिवस उजाडल्यापासून मावळेपर्यंत घाम गाळताना दिसत आहे.मृग नक्षत्र आणि शेतकरी हे खरीप हंगामाचे समीकरण बनले आहे. मृगापासून खरीप हंगामाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. येणाऱ्या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांचे अर्थशास्त्र ठरते. परंतु, गेल्या काही वर्षापासून कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ पडतोच. त्याचबरोबर अवकाळीचे अरिष्ट आणि सरकारची वक्रदृष्टी शेतकऱ्यांच्या जीवावर उठली आहे. दरवर्षी येणारा हंगाम शेतकऱ्यांची उमेद जागवतो खरी, परंतु त्याचबरोबर अनेक प्रश्नांची मालिका सोबत घेऊन येतो. शेतकऱ्यांमागचे शुक्लकाष्ठ काही केल्या संपत नाही. कोरोनाने तर दीड वर्ष झाली बळीराजाला जगणे कठीण करून ठेवले आहे. शेतात पिकले तरी बाजारपेठेची चिंता काही पाठ सोडत नाही. मागील वर्षी सोयाबीन पीक अतिवृष्टीने नेस्तनाबूत केले. कपाशीला बोंडसड व बोंडअळीने खाल्ले. तर लाॅकडाऊनमुळे आता अनेकांनी उभ्या पिकात ट्रॅक्टर घातले, नांगर चालविला. दरम्यान आर्थिक कोंडीत सापडलेला बळीराजा विविध संकटांची टांगती तलवार डोक्यावर घेऊन  यंदा चांगला पाऊस होईल आणि उत्पादन भरभरून येईल या आशेने खरिपाच्या तयारीला लागले असून पेरणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. 

गेल्या वर्षी सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकावर  विविध  रोगांचे आक्रमण झाले होते. परिणामी, तालुक्यातील सोयाबीनच्या उत्पादनात कमालीची घट आली. यंदाच्या खरीप हंगामात कपाशीच्या लागवड क्षेत्रात काही प्रमाणात वाढ होईल तर सोयाबीन क्षेत्रात घट येण्याची शक्यता आहे. तर तुरीच्या क्षेत्रात वाढ निश्चित आहे.- अश्विनी कुंभार, तालुका कृषी अधिकारी देवळी. 

 

टॅग्स :cottonकापूसagricultureशेती