शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

सततच्या पावसाने कपाशी, सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 06:00 IST

तालुक्यात आजपर्यंत ९०० मि.मी. पाऊस झाला असून सततच्या पावसाने शेतकरी रासायनिक खताची मात्रा, किडीचा नायनाट करण्यासाठी कीटकनाशकाची फवारणी योग्यरीत्या करू शकत नसल्याने खरिपातील ही दोन्ही पिके धोक्यात येण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत.

ठळक मुद्देकपाशीची मोठ्या प्रमाणावर पाती गळ, सोयाबीनच्या शेंगाही भरल्या नाही

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : तालुक्यात पावसात सातत्य कायम असल्याने कपाशीची पाती गळ सुरू असून, सोयाबीनच्या शेंगाही भरणार नाही, अशी सद्यस्थिती आहे. यामुळे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त दिसून येत आहेत.तालुक्यात आजपर्यंत ९०० मि.मी. पाऊस झाला असून सततच्या पावसाने शेतकरी रासायनिक खताची मात्रा, किडीचा नायनाट करण्यासाठी कीटकनाशकाची फवारणी योग्यरीत्या करू शकत नसल्याने खरिपातील ही दोन्ही पिके धोक्यात येण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत. यावेळी ४८ हजार १४१ हेक्टरमध्ये लागवड असून यात ३० हजार ५१० हेक्टर क्षेत्रात कपाशीचे पीक, तर १० हजार ५० हेक्टरमध्ये सोयाबीनचे पीक शेतकरी घेत आहेत.सोयाबीन पिकाच्या मळणीच्या दिवसाला अवघे काही दिवस शिल्लक आहे. नवरात्रोत्सव ते दिवाळी या दरम्यान साधारणत: मळणीचा हंगाम असतो; पण सततच्या पावसामुळे सोयाबीनच्या शेंगा भरल्या नाहीत. पावसाने विश्रांती घेतली तर तर सोयाबीनची मळणी योग्य होईल. त्यामुळे सोयाबीनचे पीक कितपत साथ देते, याबाबत साशंकता आहे. पाणबसन क्षेत्रातील कपाशीचे पीक पूर्णत: धोक्यात सापडले आहे. तर कपाशीची मोठ्या प्रमाणावर पातीगळ होत असल्याने तूर्तास कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.तुरीचे पीक धोक्यातपाऊस थांबला नाही व सतत असाच सुरू राहिल्यास कपाशी व सोयाबीन पिकामध्ये असलेले तुरीचे आंतरपीकही धोक्यात येईल, अशी शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत.या वर्षी खरीप हंगाम चांगला होईल , अशी आशा होती; पण पाऊस थांबण्याचे नावच घेत नसल्याने शेतात फवारणी करता येत नाही. त्यामुळे सोयाबीनच्या शेंगाही भरल्या नाही. कपाशीची फुले बोंड पकडण्यापूर्वीच गळत आहे. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या हतबल होण्याची वेळ आली आहे.मधुकर जानबा महाकाळकर, शेतकरी.पावसाने उघडीप झाल्यास सुधारणा होऊ शकते; पण सततच्या पावसामुळे कपाशीमध्ये पातीगळ होत आहे. तसेच आंतरिक बदल होत असल्याने किडीच्या डंकामुळे पातीफाक होऊन पाती फुलावर येताच गळत आहे. त्याकरिता प्लोनोफिक्स ५ ते ७ मिलीलिटर प्रती पंप या प्रमाणात फवारणी करावी.मंगेश ठाकरे, कृषी सहाय्यक, सेलू.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती