शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

कवडीमोल भावात कापसाची खरेदी

By admin | Updated: January 29, 2015 23:12 IST

शासनाने जाहीर केलेल्या कापसाच्या हमीभावापेक्षा कमी दराने खासगी व्यापारी जिनिंगमार्फत शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करून लूट करीत आहे़ या प्रकरणी कापूस उत्पादक शेतकरी संघाने

केळझर : शासनाने जाहीर केलेल्या कापसाच्या हमीभावापेक्षा कमी दराने खासगी व्यापारी जिनिंगमार्फत शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करून लूट करीत आहे़ या प्रकरणी कापूस उत्पादक शेतकरी संघाने जिल्हाधिकारी एऩ नवीन सोना यांची भेट घेत याकडे लक्ष वेधले़येथील शेतकरी मिलिंद हिवलेकर यांच्यासह कापूस उत्पादक शेतकरी संघाच्या शिष्टमंडळाने शेतकऱ्यांच्या दयनीय परिस्थितीचा फायदा खासगी व्यापारी घेत असल्याचे सांगितले़ यंदा नैसर्गिक वातावरण अनुकूल नसल्याने कपाशीच्या उत्पन्नात घट झाली़ यामुळे शेतीचा खर्चही निघणे शक्य नाही. शासनाने कपाशीला जाहीर केलेला हमीभाव ४०५० रुपये प्रती क्विंटल असताना खासगी जिनिंगद्वारे आपल्या मर्जीप्रमाणे दरकपात करून ३७०० ते ३८०० रुपये क्विंटल इतक्या कमी भावात शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करीत आहे. कापूस नेल्यानंतर प्रारंभी अधिक भावाने बोली करतात व कापूस खाली केल्यानंतर अत्यल्प भाव दिले जातात़ यामुळे नाईलाजास्तव शेतकऱ्यांना व्यापारी मागेल त्या भावाने कापूस विकावा लागतो. सीसीआयने हमीभावात कापूस खरेदी सुरू केली खरी; पण नियमित खरेदी होताना दिसत नाही. अधिकारी मनमर्जी कापूस खरेदी करतात व कधीही खरेदी बंदचा फलक लावतात़ यामुळे तेथे कापूस घेऊन गेलेला शेतकरी रित्या हाताने परत येतो. हा प्रकार अत्यंत क्लेषदायक व अन्यायकारक ठरत आहे़ सीसीआयने किमान आवठ्यातून सहा दिवस तरी शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे़गावातील खत विक्रेते कपाशीला लागणाऱ्या युरिया व अन्य खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांना जादा दराने विक्री करतात. यामुळे सर्वत्र शेतकऱ्यांना नागविले जात असल्याचा आरोप शिष्टमंडळाने केला़ शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या या समस्यांकडे जिल्हाधिकारी सोना यांचे लक्ष वेधून यावर त्वरित उपाययोजना करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी कापूस उत्पादक शेतकरी संघाने निवेदनातून केली आहे. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.(वार्ताहर)