शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोनाचे नवे 27 हॉटस्पॉट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:00 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून जिल्ह्यात ज्या ठिकाणी कोरोनाचे जास्त रुग्ण असे ठिकाण निश्चित करून ते ठिकाण कोरोना हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात आले आहे. या ठिकाणी रुग्ण असलेला परिवार गृह अलगीकरणात राहणार असून, त्या परिवारातील रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कमीतकमी २० व्यक्तींची आरटीपीसीआर पद्धतीने कोविड चाचणी करण्यात येणार आहे. शिवाय या परिसरातील नागरिकांवर सोशल पोलिसिंगद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे.

ठळक मुद्देवर्धा तालुका आघाडीवरच : मागील सात दिवसात आढळले ५५८ नवीन कोविड बाधित

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील काही दिवसापासून जिल्ह्यात नवीन कोविडबाधित सापडण्याची गती वाढली आहे. १२ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी या काळात सर्वाधिक रुग्ण जिल्ह्यातील कुठल्या भागात आढळले याचा बारकाईने अभ्यास जिल्हा प्रशासनाने केला असता, जिल्ह्यात कोरोनाचे तब्बल २७ हॉटस्पॉट असल्याचे पुढे आले आहे. मागील सात दिवसाच्या काळात जिल्ह्यात ५५८ नवीन कोविडबाधितांची नोंद घेण्यात आली असून, त्यापैकी बहुतांश कोविडबाधित याच हॉटस्पॉट परिसरातील रहिवासी आहेत. विशेष म्हणजे २७ पैकी २१ हॉटस्पॉट एकट्या वर्धा तालुक्यात  आहेत.जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून जिल्ह्यात ज्या ठिकाणी कोरोनाचे जास्त रुग्ण असे ठिकाण निश्चित करून ते ठिकाण कोरोना हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात आले आहे. या ठिकाणी रुग्ण असलेला परिवार गृह अलगीकरणात राहणार असून, त्या परिवारातील रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कमीतकमी २० व्यक्तींची आरटीपीसीआर पद्धतीने कोविड चाचणी करण्यात येणार आहे. शिवाय या परिसरातील नागरिकांवर सोशल पोलिसिंगद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे. सोशल पोलिसिंगमध्ये सामाजिक संस्था, पोलीस, महसूल, नगरपालिका आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग राहणार आहे. तसेच घरोघरी जावून आरोग्य कर्मचारी संशयित रुग्ण व आजारी व्यक्तींची माहिती जाणून घेणार आहेत.

खासगी डॉक्टरांना लक्षणे असलेल्यांची करून घ्यावी लागेल कोविड टेस्ट वर्धा शहरसह ग्रामीण भागातील खासगी डॉक्टरांकडे कोरोनाची लक्षणे असलेले रुग्ण उपचार घेण्यासाठी आल्यास त्या रुग्णाबाबतची माहिती वर्धा नगरपालिकेने तयार केलेल्या लिंकवर दररोज टाकावी लागणार आहे. शिवाय ज्या रुग्णामध्ये कोरोनाची प्राथमिक लक्षणे आहेत अशांनी कोरोना टेस्ट करावी, यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहे. तशा सूचना जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सर्व खासगी डॉक्टरांना दिल्या आहेत. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या