शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने शिकविली कॉस्ट कटिंग; किचनपासून कटिंगपर्यंत खर्चकपात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 05:00 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जंकफूड, बाहेरील खाद्य पदार्थ खाणे टाळण्याच्या सूचना आरोग्य विभागाने वारंवार दिल्या. कोराेना विषाणू होण्यापासून वाचण्यासाठी सकस आहार घ्या, हिरव्या पालेभाज्या जेवणात घ्या, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. त्या सूचनांचे पालन करून तसेच कोरोनाने सर्व काही ठप्प असल्याने अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने गृहिणींचेही बजेट कोलमडले. त्या अनुषंगाने गृहिणींनी किचनमध्ये कॉस्टकटिंग करण्याला सुरुवात केली.

ठळक मुद्देसकस आहारावर दिला जातोय भर : आरोग्याच्या दृष्टीने गृहिणींनी उचलले पाऊल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी मार्च महिन्यापासून लॉकडाऊन लागले. सर्व काही ठप्प झाले होते. त्यातच महागाईदेखील वाढली. त्यामुळे गृहिणींनी किचनपासून तर कटिंगपर्यंत खर्चात कपात केली. केवळ सकस आहारावरच जोर दिल्याचे गृहिणींशी संवाद साधताना लक्षात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जंकफूड, बाहेरील खाद्य पदार्थ खाणे टाळण्याच्या सूचना आरोग्य विभागाने वारंवार दिल्या. कोराेना विषाणू होण्यापासून वाचण्यासाठी सकस आहार घ्या, हिरव्या पालेभाज्या जेवणात घ्या, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. त्या सूचनांचे पालन करून तसेच कोरोनाने सर्व काही ठप्प असल्याने अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने गृहिणींचेही बजेट कोलमडले. त्या अनुषंगाने गृहिणींनी किचनमध्ये कॉस्टकटिंग करण्याला सुरुवात केली. तेलाचा वापर कमी केला, हॉटेलिंग बंद केले, इतकेच नव्हे तर घरातच विविध पदार्थ बनविल्याने खर्चकपात केल्याचे  गृहिणींशी साधलेल्या संवादातून दिसून आले.  

कुठे कुठे केली कॉस्ट कटिंग 

कोरोनात आरोग्य चांगले राहण्यासाठी तेलाचा  वापर कमी केला. कुटुंबाचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी हिरव्या पालेभाज्यांचा वापर जेवणात अधिक प्रमाणात करण्यात आला.पारंपरिक भाज्यांना अधिक महत्व देण्यात आले. हॉटेलिंग बंद केली. बाहेरचे खाद्यपदार्थ खाणे टाळण्यात आले. इतकेच नव्हे तर घरातही तेलाचा वापर कमी करण्यात आला.मुला-बाळांच्या कटिंग घरच्या घरीच केल्या. इतकेच नव्हे तर पुरुषांनीदेखील दाढी घरीच केली. त्यामुळे त्याचाही खर्च वाचला. कोणत्याही नवीन वस्तू खरेदी करणे टाळले.

हॉटेलिंग थांबविल्याने पैसे वाचले...

नैना प्राजक्त ढोबळे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, आम्ही दोघेच जण घरात राहतो. कोरोनामुळे कामाचा ताणही वाढला आहे. त्यातच खर्च कपातही करावी लागत आहे. कडधान्य आणि सकस आहारच दररोज जेवणात घेत आहे. 

दोन्ही वेळ घेतला सकस आहार

प्रियंका हटवार यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, कोरोनात आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी बाहेरचे खाणे टाळले. दोन्ही वेळ सकस आहारच घेतला. जेवणात हिरव्या पालेभाज्यांचा अधिक वापर केल्याने किचनच्या साहित्यातही कपात झाली.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या