शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिलांसह पुरूषाचा कोरोनाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 05:00 IST

कोविड-१९ विषाणू वर्धा जिल्ह्यातील नागरिकांना झपाट्यानेच आपल्या कवेत घेत आहे. शिवाय कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असल्याने जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन नागरिकांनी करावे असे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे. बुधवारी आरोग्य विभागाला ७९६ व्यक्तींचे कोविड चाचणी अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १८५ व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे.

ठळक मुद्देकोविड मृतकांची संख्या ३७ : बुधवारी जिल्ह्यात आढळले नवे १८५ कोविड बाधित

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बुधवारी ३५ व्यक्तींनी कोरोनावर विजय मिळविल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली असली तरी पुलगाव येथील एक पुरूष, वर्धा आणि हिंगणघाट येथील महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. बुधवारी तीन कोविड बाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोविड मृतकांची संख्या ३५ झाली आहे. मात्र, त्यापैकी एकाचा मृत्यू इतर आजाराने झाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.कोविड-१९ विषाणू वर्धा जिल्ह्यातील नागरिकांना झपाट्यानेच आपल्या कवेत घेत आहे. शिवाय कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असल्याने जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन नागरिकांनी करावे असे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे. बुधवारी आरोग्य विभागाला ७९६ व्यक्तींचे कोविड चाचणी अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १८५ व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. सध्या जिल्ह्यात कोरोना सुमारे १०.१ च्या दराने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनीही मास्कचा वापर करणे तसेच गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळत दक्ष राहण्याची गरज आहे. बुधवारी आढळलेल्या नवीन कोरोना बाधितांमध्ये १०२ पुरुष तर ८३ महिलांचा समावेश असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. जिल्ह्यात ग्रामीण रुग्णालय, शासकीय कार्यालय तसेच राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांमधील कर्मचारी मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित होत आहेत.९८३ अ‍ॅक्टिव्ह रुग्णांवर होतोय उपचारसेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय तसेच सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाला कोविड रुग्णालय म्हणून जाहीर करण्यात आले आहे. याच रुग्णालयात सध्या कोविड बाधितांवर उपचार होत असून सध्या या दोन्ही कोविड रुग्णालयात ९८३ अ‍ॅक्टिव्ह कोविड रुग्ण आहेत. त्यांना चांगली आरोग्य सूविधा देण्यासाठी डॉक्टर व रुग्णालय प्रशासन प्रयत्न करीत आहेत.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याDeathमृत्यू