शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
3
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
4
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
5
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
6
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
7
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
8
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
9
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
10
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
11
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
12
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
13
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
14
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
15
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
16
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
17
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
18
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
19
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
20
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
Daily Top 2Weekly Top 5

‘पर्यावरण हक्क व शाश्वत विकास’वर अधिवेशन

By admin | Updated: November 14, 2016 00:52 IST

सेवाग्राम येथील यात्रीनिवास येथे ‘नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ वुमेन चाईल्ड अ‍ॅन्ड युथ डेव्हलपमेंट’ नागपूर

देशातील १८ राज्यातून २०० युवक-युवतींचा सहभाग
वर्धा : सेवाग्राम येथील यात्रीनिवास येथे ‘नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ वुमेन चाईल्ड अ‍ॅन्ड युथ डेव्हलपमेंट’ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पर्यावरण हक्क व शास्वत विकास’ विषयावर तीन दिवसीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले. यात देशातील १८ राज्यातील विविध सामाजिक संस्थांमध्ये पर्यावरणावर कार्य करणारे २०० युवक-युवती सहभागी झाले. अधिवेशनाचे उद्घाटन जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांच्या हस्ते झाले.
मंचावर अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय दैने, न्यूसिडचे अध्यक्ष राजेश मालविय, इन्ग्रीड मेन्डोन्सा विभागीय समन्वयक टेरेडेस होम्स पुणे व सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर, जॉर्ज चिरा उपस्थित होते.
दीप्रज्वलनानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. नयना गुंडे यांनी, आज पर्यावरणावर मोठ्या प्रमाणात प्रभाव व परिणाम प्रदूषणावर होत आहे. आज आनंददायी आणि कौतुकाची बाब म्हणजे युवक-युवतींनी पर्यावरणाचे महत्त्व जाणले आणि यासाठी ते काम करीत असल्याचे दिसून येत आहे; पण ही चळवळ मोठ्या संख्येने पुढे नेणे गरजेचे आहे. या कार्याची धुरा युवक-युवतींनी आपल्या खांद्यावर घेतल्यास सकारात्मक परिणाम दिसल्याशिवाय राहणार नाही, असे सांगितले.


रॅली, पथनाट्य सादरीकरणाने अधिवेशनाचा समारोप

प्रत्येक राज्यातील युवा प्रतिनिधींनी पर्यावरण जागृतीसाठी विविध स्टॉल लावून प्रदर्शन केले. शनिवारी म. गांधी विद्यालय ते वर्धा शहरापर्यंत रॅली काढली. यात प्लास्टिक वापरावर बंदी, झाडे लावा झाडे वाचवा, पाण्याचा संतुलीत वापर आदींवर पथनाट्य सादर केले. रविवारी समुह चर्चा झाली व घोषणापत्र वाटले गेले. यानंतर अधिवेशनाचा समारोप मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. इनग्रीड मॅन्डोसा, आर.के. मालविया, न्यूसीड नागपूर यांच्या मार्गदर्शनामध्ये सदर अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते.