शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

देयकाकरिता कंत्राटदाराने लावला गळफास

By admin | Updated: May 6, 2015 00:02 IST

बांधकामाचे देयक न मिळाल्याने वैतागलेल्या येथील एका कंत्राटदाराने राहत्या घरी गळफास लावला.

चिठ्ठीही सापडली : अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी हिंगणघाट : बांधकामाचे देयक न मिळाल्याने वैतागलेल्या येथील एका कंत्राटदाराने राहत्या घरी गळफास लावला. यात त्याचा मृत्यू झाला. राजेंद्र अवचट (५०) रा. संत तुकडोजी वॉर्ड असे या कत्राटदाराचे नाव आहे. ही घटना मंगळवारी सकाळी उघड झाली. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र अवचट बांधकाम कंत्राटदार होते. त्यांनी एका खासगी कंपनीचा डांबर गुफीलींगचा लेबर कंत्राट घेतला होता. यात काम केल्यानंतर कामाचे देयक कंपनीला सादर केल्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्याला ते देण्यास टाळाटाळ केली. अखेर कामाचे देयक देण्याचे नाकारले. या कंत्राटी कामासाठी जवळच्या नातेवाईकाकडून उसनवार घेवून एक २०७ वाहन व डांबराचे यंत्र खरेदी केले होते. घेतलेले पैसे परत करायचे असताना थकित देयकाकरिता नकार मिळाल्याने त्यांची मानसिक स्थिती ढासळली. अशा स्थितीत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पैसे देत नाही काय करायचे ते करून घे असे म्हटल्याचे मृतकाने मृत्युपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत नमूद आहे. या चिठ्ठीत त्या अधिकाऱ्यांची नावेही आहेत. या अधिकाऱ्यांनी आपली फसवणूक केली असून त्यांच्यावर कारवाई करीत थकित देयकाची रक्कम परिवाराला देण्याचे व गोविंद सर यांना शिक्षा देण्याचे लिहून ठेवले आहे.मंगळवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास मृतक व त्यांची पत्नी झोपून उठले. यावेळी नित्याप्रमाणे त्यांची पत्नी फिरायला गेली. त्या ७ वाजताच्या दरम्यान घरी परत आल्या असता त्यांना राजेंद्रचा मृतदेह पंख्याला नायलॉन दोरीने फासी लागून दिसला. त्यांनी आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिक जमले. पोलिसांना सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी यावेळी मृतकाच्या खिशातून एक चिठ्ठी ताब्यात घेतली.यासंदर्भात मृतकाचा मुलगा प्रणय राजेंद्र अवचट यांच्या तक्रारीवरून हिंगणघाट पोलिसांनी भादंविच्या ३०६ अन्वये गुन्हा दाखल केला असून ठाणेदार मोतीराम बोडखे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. मृतक राजेंद्र अवचट यांचा मुलगा प्रणय बुटीबोरी येथे अभियंता असून मुलगी नागपूरला अभियंता म्हणून नोकरीला आहे. अवचट यांच्या आत्महत्येने कंत्राटदार वर्गात विविध चर्चा सुरू आहे.(तालुका प्रतिनिधी) मृत कंत्राटदाराच्या चिठ्ठीत अधिकाऱ्यांची नावे मृतक राजेंद्र यांनी आत्महत्या केली त्यावेळी त्रास देणाऱ्या कंपनीच्या काही अधिकाऱ्यांची नावे त्याने चिठ्ठीत लिहून ठेवली आहेत. शिवाय त्यात ही कंपनी एका मंत्र्याची असून ती दुसऱ्याच्या नावाने सुरू असल्याचे लिहिले आहे. यात कंपनीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मृतकाच्या खिशात असलेली चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली आहे. त्यात उल्लेख असलेल्या संबंधीतांची चौकशी करून ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. प्रारंभी भादंविच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. काय ते सत्य तपासाअंती समोर येईलच.- मोतीराम बोडखे, ठाणेदार, हिंगणघाट