शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

सतत परिवर्तन म्हणजेच शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 06:00 IST

त:ची संवाद साधण्याची ताकत ज्यात आहे तोच खरा यशस्वी होतो. हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे, असे प्रतिपादन माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंतराव पुरके यांनी केले. ते राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोलत होते.

ठळक मुद्देवसंत पुरके : मुख्याध्यापकांचे अधिवेशन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मुख्याध्यापकांमध्ये असणारे गुण आणि चातुर्य यावरून त्या शाळांची ओळख होते. शिक्षकांनी चांगल्या सवयी लावल्याशिवाय परिवर्तन होऊ शकत नाही. व्यक्ती वर्तनातील सतत परिवर्तन म्हणजे शिक्षण असून रंजनमूल्ये आणि प्रबोधन मूल्य जोपासली तर प्रशिक्षण प्रभावी होते. स्वत:ची संवाद साधण्याची ताकत ज्यात आहे तोच खरा यशस्वी होतो. हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे, असे प्रतिपादन माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंतराव पुरके यांनी केले. ते राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोलत होते.अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष रावसाहेब आवारी होते. व्यासपीठावर नागपूर बोर्डाचे अध्यक्ष रविकांत देशपांडे, मारुती खेडकर, दीपक दोदल, नंदकुमार बारवकर, शत्रुघन बिडकर, युनुस पटेल, भागचंद आवताडे, शंकरराव निंबाळकर, मोहन पाटील, नरेशचंद्र वाळके, हरिभाऊ दंडारे, दीपक पुनसे, पांडुरंग साखरकर, अभिजित वंजारी, प्रकाश काळे, सतीश जगताप, मनोहर बारस्कर, प्रदीप गोमासे, दिलीप बोरकर, सतीश ठाकरे, रामेश्वर लांडे, रंजना दाते, हरीष पुनसे, मदन मोहता, संजय नांदे, देशमुख रवींद्र गोळे, बळीराम चव्हाण, मिलिंद सालोडकर, हरीष पुनसे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान विवेक अरोगे, अपूर्वा जगताप, साहिल पांडे याचा सत्कार करण्यात आला. प्रथम सत्रात शैक्षणिक गुणवत्ता शिक्षक व पालक भूमिका या विषयावर मराठवाडा विभागाचे शोध निबंध सादर केला. डॉ. वेदप्रकाश मिश्र म्हणाले की, मुख्याध्यापकाचे स्थान जगात उच्चस्थानी आहे; पण शासन आणि समाज मुख्याध्यापकाला योग्य स्थान आणि महत्त्व देत नाही. ही शोकांतिका आहे. रविकांत देशपांडे व राजेंद्र भुतडा यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. शिक्षण महर्षी रावसाहेब आवारी पुरस्काराने युनूस पटेल, नरेशचंद्र वाळके, मारोती खेडकर यांना गौरविण्यात आले. संचालन अतुल देवडे, मिलिंद मुळे, ज्योती भगत यांनी केले तर आभार प्रदीप गोमासे यांनी मानले.

टॅग्स :Educationशिक्षण