शहरं
Join us  
Trending Stories
1
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
2
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
3
स्टार क्रिकेटर युवराज सिंगसोबत स्टेजवर असताना अभिनेत्रीने केली 'ती' कृती; Video होतोय व्हायरल
4
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
5
IPL 2026: भर मैदानात राडा? मग क्रुणाल पांड्याची इन्स्टाग्राम पोस्ट; त्यावर पूरननं केली 'अशी' कमेंट!
6
कार वापरताय? मग तुमच्या गरजेनुसार निवडा ‘हे’ विशेष ॲड-ऑन्स, वेळीच करा पैशांची बचत!
7
MCX Share Price: मार्च तिमाहीत एमसीएक्सचा नफा २९१% नं वाढला, ११ मे रोजी रॉकेट बनू शकतो शेअर
8
तामिळनाडूत सत्तेचं गणित जुळेना, विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाला विलंब, चाहत्यानं स्वत: पेटवून घेतलं!
9
नवीन फोन घेतलाय? मग 'या' ५ सेटिंग्ज लगेच करा; एका चुकीमुळे होऊ शकतं मोठं नुकसान!
10
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
11
यशस्वी जैस्वालच्या अडचणी वाढल्या, NADA नं बजावली नोटीस; शेफाली वर्माही कारवाईच्या रडारवर
12
'राजा शिवाजी'ने आतापर्यंत कमावले 'इतके' कोटी, दुसऱ्या शुक्रवारचे आकडे समोर
13
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
14
गळाभेट घेतली, नमस्कार केला, पंतप्रधान मोदी भर मंचावर कुणासमोर झाले नतमस्तक, ती ज्येष्ठ व्यक्ती कोण?
15
प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह
16
Budget Travel: खिशात ५० हजार अन् परदेश वारी! 'या' ७ देशांमध्ये भारतीय रुपया आहे लय भारी
17
सामुद्रिक शास्त्र : डोळा लवणे शुभ की अशुभ? स्त्री आणि पुरुषांसाठी काय आहेत याचे वेगवेगळे अर्थ!
18
महागड्या Personal Loan ला विसरा; PPF खात्यावर मिळवू शकता स्वस्त कर्ज, जाणून घ्या नियम
19
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
20
Astro Tips: देवापर्यंत प्रार्थना पोहोचली हे कसे ओळखावे? पूजेदरम्यान मिळणाऱ्या 'या' ५ खुणांचा नेमका अर्थ
Daily Top 2Weekly Top 5

गावकऱ्यांच्या सहकार्यातून सिमेंट रस्ता बांधकाम

By admin | Updated: June 3, 2016 02:14 IST

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास करण्यासाठी थार ग्रामपंचायतला चार लक्ष रूपयांचा निधी प्राप्त झाला होता.

थारच्या दलित वस्ती कामाचा आगळावेगळा उपक्रम
आष्टी (शहीद) : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास करण्यासाठी थार ग्रामपंचायतला चार लक्ष रूपयांचा निधी प्राप्त झाला होता. दरवेळी निविदा झाल्यावर कामांना विलंब होतो म्हणून यावेळी आधी उत्कृष्ट काम करूनच निविदा तयार करण्याचा निर्णय ग्रामस्थांसह ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांनी घेतला. लागलीच त्याची अंमलबजावणी करण्यात आली. यामध्ये १७ मीटर काम जादा करण्यात आले. या स्तुत्य उपक्रमाची दखल पंचायत समिती प्रशासनाने घेवून ग्रा.पं.चे कौतुक केले आहे.
उन्हाळ्याचे दिवस असल्याने थार गावात तीव्र पाणीटंचाई आहे. अशा परिस्थितीत काम करण्यासाठी पाणी कुठून उपलब्ध करावे हा प्रश्न होता. सरपंच वनिता केवटे, उपसरपंच दिलीप सागडे, माजी सरपंच राजू निस्वादे, ग्रा.पं. सदस्य अरूण घोडीले यांनी दलित वस्ती कामासाठी लागणारे पाणी टँकरद्वारे आष्टीवरून आणण्याचा निर्णय घेतला. ई-निविदा झाल्यावर काम चांगले होणार नाही, यामध्ये बिलो दराने निविदा जाईल, अशी चर्चा झाली. त्यामुळे ग्रा.पं. पदाधिकारी स्वत: काम करून घेण्यास सरसावले. एका कंत्राटदाराला उधारीमध्ये साहित्य व पाणी उपलब्ध करून देण्याची विनंती केली. संबंधित कंत्राटदाराने क्षणाचाही विलंब न लावता गिट्टी, सिमेंट, रेती, पाणी टँकर उपलब्ध करून दिला. लागलीच कामाला सुरूवात झाली.
इस्टीमेटमध्ये लोखंड टाकण्याची तरतुद होती. मात्र अंतर्गत रस्ता असल्याने लोखंड टाकण्याची गरज नाही, असे सरपंच वनिता केवटे यांनी ठरविले. सर्व सदस्यांनी होकार दिला. त्या पैशात १७ मीटर काम ईस्टीमेटच्या तरतुदीपेक्षा जास्त करण्यात आले.
अवघ्या आठ दिवसात सर्व काम झाले आहे. २१ दिवस पाणी मारण्यात आले. सदर कामाची पाहणी समाजकल्याण सभापती वसंतराव पाचोडे, गटविकास अधिकारी माणिक चव्हाण, शाखा अभियंता के.एच. बिंझाडे यांनी करीत काम पाहून समाधान व्यक्त केले. पंचायत समिती सभापती अर्चना रहाटे यांनी सरपंच वनिता केवटे, ग्रामसेवक रमेश सावरकर यांचे कौतुक केले.
शासनाने ई-निविदा करण्याची अट घालून दिली असल्याने आता गावकऱ्यांच्या पुढाकाराने काम पूर्ण झाले असून निविदा प्रक्रिया पूर्ण करूनच बील काढल्या जाणार असल्याची माहिती सरपंच वनिता केवटे यांनी दिली.(प्रतिनिधी)