शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील संपूर्ण लसीकरण अवघडच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 05:00 IST

लसीकरण मोहीम सुरू झाल्यावर लसीबाबत अनेक गैरसमज सोशल मीडियावर पसरविले जात होते. पण जिल्ह्यात झालेल्या प्रभावी जनजागृतीमुळे कोरोना काळात महत्त्वाची ठरणाऱ्या महालसीकरण मोहिमेला नागरिकांचा स्वयंस्फूर्तीने प्रतिासाद मिळत आहे. त्यामुळे आतापर्यंत कोविड लसीचे तब्बल २ लाख ७३ हजार ८७८ डोस नागरिकांना देण्यात आले आहेत.

ठळक मुद्दे२,१८,९८० व्यक्तींना पहिला तर ५४,८९८ लाभार्थ्यांना लसीचा दुसरा डोस

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्याची लोकसंख्या १३ लाखाहून अधिक आहे. पण आतापर्यंत जिल्ह्यात केवळ २ लाख १८ हजार ९८० व्यक्तींना लसीचा पहिला तर ५४ हजार ८९८ लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. डिसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरण केले जाईल, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले असले तरी लसतुटवड्यामुळे कासवगतीनेच जिल्ह्यात महालसीकरण मोहीम सुरू आहे. त्यामुळे डिसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरण अवघडच असल्याचे बोलले जात आहे.लसीकरण मोहीम सुरू झाल्यावर लसीबाबत अनेक गैरसमज सोशल मीडियावर पसरविले जात होते. पण जिल्ह्यात झालेल्या प्रभावी जनजागृतीमुळे कोरोना काळात महत्त्वाची ठरणाऱ्या महालसीकरण मोहिमेला नागरिकांचा स्वयंस्फूर्तीने प्रतिासाद मिळत आहे. त्यामुळे आतापर्यंत कोविड लसीचे तब्बल २ लाख ७३ हजार ८७८ डोस नागरिकांना देण्यात आले आहेत. मात्र, वर्धेकरांचा लसीकरण मोहिमेला मिळत असलेल्या प्रतिसादाच्या तुलनेत सध्या अतिशय अल्प लससाठा वर्धा जिल्ह्याला उपलब्ध करून दिला जात आहे. त्यामुळे सध्यास्थितीत १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांना कोविडची प्रतिबंधात्मक लस देण्याच्या मोहिमेला ब्रेक लागला आहे. असे असले तरी शासनाने वर्धा जिल्ह्याला मुबलक लससाठी उपलब्ध करून दिला आणि पुढेही लसीकरण मोहिमेला नागरिकांचा स्वयंस्फूर्त प्रतिसाद राहिला तरच डिसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरण होईल, असेही सांगण्यात येते. विशेष म्हणजे लाभार्थ्यांना देण्यात येणारी व्हॅक्सिन ही कोविड मृत्यू रोखण्यासाठी उपयुक्तच आहे.

लसीकरण केंद्रांची संख्या झाली ११५- १६ जानेवारीपासून जिल्ह्यात लसीकरण मोहिमेला सुरूवात झाली असून सुरूवातीला मोजक्याच केंद्रांवरून लाभार्थ्यांना कोरोनाची प्रतिबंधात्मक लस दिली जात होती. तर हळूहळू लसीकरण केंद्रांच्या संख्येत वाढ झाल्याने सध्या लसीकरण केंद्रांची संख्या ११५ झाली आहे. परंतु, लस तुटवड्यामुळे काही मोजक्यात केंद्रांवरून सध्या लाभार्थ्यांना कोविडची लस द्यावी लागत आहे.

एकाच दिवशी दहा हजार व्यक्तींना व्हॅक्सिनेशनचा विक्रम- सध्या दरराेज सरासरी किमान १ हजार ५०० व्यक्तींना कोविडची प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. विशेष म्हणजे एकाच दिवशी तब्बल दहा हजारहून अधिक व्यक्तींना कोविडची व्हॅक्सिन दिल्याचा जिल्ह्यात विक्रम आहे. पण सध्या मुबलक लसच वर्धा जिल्ह्याला मिळत नसल्याने लसीकरण मोहिमेला पाहिजे तशी गतीच मिळत नसल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. 

१८ ते ४४ वयोगटातील लसीकरण थांबलेजिल्ह्यामध्ये सुरूवातीपासूनच लसीचा तुटवडा जाणवला. आताही लस नसल्याने १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांना कोरोनाची प्रतिबंधात्मक लस देण्याच्या कामाला ब्रेक लागला आहे. मुबलक लससाठा मिळाल्यावर या वयोगटातील लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात येईल, असे सांगण्यात आले.केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त होताच जिल्ह्यात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांना ऑनलाईन व अपॉईमेंट घेतल्यावर कोविडची लस देण्यास सुरूवात झाली होती. पण सध्या लस तुटवड्यामुळे हे काम थंडबस्त्यात पडले आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या