शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आम आदमी विमा योजना कागदावरच

By admin | Updated: September 8, 2014 01:33 IST

ग्रामीण भागातील शेतमजूर तथा भूमिहीन, अल्पभूधारक शेतकरी यांच्यासाठी राज्य शासनाच्या विशेष सहाय्य विभागाकडून आम आदमी विमा योजना सुरू करण्यात आली.

अमोल सोटे आष्टी (शहीद)ग्रामीण भागातील शेतमजूर तथा भूमिहीन, अल्पभूधारक शेतकरी यांच्यासाठी राज्य शासनाच्या विशेष सहाय्य विभागाकडून आम आदमी विमा योजना सुरू करण्यात आली. ही योजना राबविताना संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करीत असल्याने केवळ कागदावरच राहिल्याचे वास्तव आहे. सन २०१३-१४ या वर्षात जिल्ह्यात केवळ ३० व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळाला आहे.आम आदमी विमा योजनेसाठी केंद्राकडून शंभर तर राज्याकडून शंभर रुपये असा एकूण २०० रुपयांचा वार्षिक हप्ता आहे. योजनेसाठी पात्र ठरलेल्या शेतकरी, शेतमजुरांचे अर्ज तलाठ्यांमार्फत भरावे लागतात. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास ३० हजार रुपये, अपघाती मृत्यू झाल्यास ७५ हजार रुपये, अवयव निकामी झाल्यास ३७ हजार ५०० व दोन्ही अवयव निकामी झाल्यास ७५ हजार रुपयांचे विमा संरक्षण दिल्या जाते. गत वर्षी एप्रिल २०१३ पासून मार्च २०१४ पर्यंत आष्टी तालुक्यात १७ हजार ४२५ कुटुंब, आर्वीत २२ हजार, कारंजात १९ हजार, देवळीत १३ हजार ४७०, वर्धेत १७ हजार ९००, सेलूत १२ हजार ६८५, हिंगणघाट येथे १९ हजार ४३०, आणि समुद्रपूर तालुक्यातील ११ हजार कुटुंबे या योजनेसाठी पात्र ठरविण्यात आले.या योजनेत पात्र झालेल्याचे पाल्य इयत्ता नववी ते बारावी मध्ये शिक्षण घेत असतील तर त्यांना प्रतिमहिना शंभर रुपये प्रमाणे १० महिन्याचे एक हजार रुपये देण्यात येते. जिल्ह्यात हजारो विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज दाखल केले; परंतु अद्यापपर्यंत त्यांच्या हाती एक रुपयाही पडला नाही. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नसल्याने शासनाबद्दल संताप व्यक्त होत आहे. शासनाकडून शिष्यवृत्तीचा पाठपुरावा न झाल्यामुळे संबंधित शाळेचे विद्यार्थी व त्यांचे पालक, तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी यांना भेटून माझ्या पाल्याच्या शिष्यवृत्तीचे काय झाले असा प्रश्न विचारत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय ही योजना योग्य रित्या राबविण्यासाठी कुचराई करीत असल्याची माहिती आहे. शासनाने तत्काळ लाभ देण्याची मागणी जिल्ह्यात जोर धरत आहे.