शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीवर कोळशाचा हल्ला

By admin | Updated: December 25, 2016 02:19 IST

तालुक्यातील शेतकरी आधीच नैसर्गिक आपत्ती, नापिकी व आर्थिक कर्जबाजारीपणामुळे त्रस्त आहे.

आर्वीतील शेतकरी चिंतेत : अचानक वाढलेल्या थंडीचा परिणाम आर्वी : तालुक्यातील शेतकरी आधीच नैसर्गिक आपत्ती, नापिकी व आर्थिक कर्जबाजारीपणामुळे त्रस्त आहे. असे असताना तालुक्यात अचानक वाढलेल्या थंडीने कपाशीवर कोळसा रोगाचे आक्रमण केले आहे. या रोगामुळे कपाशीचे झाड पूर्णत: काळे पडून वाकत असल्याचे चित्र तालुक्यातील शेत शिवारात आहे. कपाशी पिकावर आलेल्या या रोगाने शेतकरी धास्तावला असून यामुळे त्याच्या उत्पन्नावरही विपरीत परिणाम होण्याची चिन्हे आहेत. आर्वी तालुक्यात नगदी व एकरकमी पीक म्हणून कपाशीकडे पाहिले जाते. प्रारंभी तालुक्यात कपाशी पिकावर लाल्याचे आक्रमण झाले. त्यापूर्वी अतिवृष्टीच्या फटक्यामुळे पिकाच्या उत्पादनावर विपरित झाला. यामुळे कपाशी पिकावरील बोंडे खाली गळून पडली तर पिकाची वाढ खुंटली. या संकटातून शेतकऱ्यांची सुटका होते न होते तोच कपाशीवर कोळसा रोगाने हल्ला चढविला आहे. या रोगामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशीची झाडे पूर्णत: काळी पडली आहेत. तालुक्यातील वागदा, वाठोडा, अहिरवाडा, देऊरवाडा, लाडेगाव, कर्माबाद, सर्कसपूर, राजापूर, नांदपूर, टाकरखेडा, एकलारा, जळगाव, वर्धमनेरी, वाढोणा, पिंपळखुटा, गुमगाव, रोहणा, नांदोरा, नेरी, खुबगाव, धनोडी, रसुलाबाद, दहेगाव, निंबोली (शेंडे) सह तालुक्यातील इतर गावांतील शेत शिवारात या रोगाचे चित्र आहे. या रोगामुळे पीक काळे पडल्याने शेतकऱ्यांनी शेताकडे जाणे टाळणे सुरू केल्याचे दिसून आले आहे. यावर्षी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन न झाल्याने कपाशीवर शेतकऱ्यांची आशा होती. यातही या पिकावर कोळशासारख्या रोगाचे आक्रमण झाल्याने तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. कृषी विभागाने या रोगाबाबत शेतकऱ्यांना माहिती देऊन उपाययोजना सुचविण्याची मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.(तालुका प्रतिनिधी) २३,६०० हेक्टरवरील पीक धोक्यात तालुक्यातील बेनोडा येथील रामेश्वर जवंजाळ, नारायण भागवत, राजेंद्र चव्हाण, प्रज्वल गावंडे, रवींद्र वानखेडे, उमेश एकापूरे, पद्माकर गावंडे, सतीश भागवत, ओंकार गावंडे, दशरथ डेहनकर, जर्नादन मेश्राम यांच्यासह या परिसरात असलेल्या बेनोडा, मारोडा या दोन्ही गावातील ९० हेक्टर शेतपिकांच्या कपाशीवर या कोळसा रोगाचे आक्रमण झाले आहे. यात झाडाची पाने काळी पडून ती वाळू लागल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यात आर्वी तालुक्यातील २३ हजार ६०० हेक्टरचे कपाशी पीक धोक्यात आले आहे.