शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
3
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
4
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
5
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
6
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
7
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
8
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
9
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
10
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
11
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
12
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
13
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
14
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
15
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
16
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
17
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
18
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
19
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
20
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
Daily Top 2Weekly Top 5

गोठ्याला लावलेल्या आगीत शेतीपयोगी साहित्याचा कोळसा

By admin | Updated: May 1, 2017 00:36 IST

कामठी गावात महिला मंडळासह दारूबंदी केल्याने अज्ञात इसमांनी मुन्ना पाठक यांच्या गोठ्याला आग लावली.

पोलीस कारवाईत दिरंगाई : दारूबंदीमुळे काढला वचपा झडशी : कामठी गावात महिला मंडळासह दारूबंदी केल्याने अज्ञात इसमांनी मुन्ना पाठक यांच्या गोठ्याला आग लावली. यात गोठ्यातील शेतीपयोगी साहित्य, मोटर पंप, पाईप, खते आदी साहित्य जळून खाक झाले. ही घटना २५ एप्रिल रोजी घडली. यात त्यांचे मोठे नुकसान झाले. तक्रारीनंतर पोलिसांनी केवळ गुन्हा दाखल केला; पण अद्याप आरोपीला अटक केली नाही. यामुळे गोठा पेटविणारा आरोपी शोधून त्याला अटक करावी व नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पाठक यांनी केली आहे. सेलू तालुक्यातील सुरगाव नजीक कामठी हे २५-३० घरांच्या लोकवस्तीचे गाव आहे. या गावात दारूविक्रीचे प्रमाण अधिक आहे. गावठी दारूच्या व्यवसायामुळे महिलांना त्रास होता. यामुळे महिलांनी दारूबंदी महिला मंडळ स्थापन केले. मुन्ना पाठक यांच्या पुढाकाराने महिलांनी दारूबंदी मोहीम राबविली. यामुळे दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले. दारूबंदीमुळे गावात शांतता निर्माण झाली; पण दारूविक्रेत्यांकडून मंडळातील महिलांचा छळ होऊ लागला. अशातच २५ एप्रिल रोजी पुढाकार घेणाऱ्या पाठक यांच्या शेतातील गोठ्याला आग लावण्यात आली. सदर घटनेची माहिती दुसऱ्या दिवशी सकाळी पाठक कुटुंबियांनी सेलू पोलीस ठाण्यात दिली. संशयीत व्यक्तींची नावेही सांगितली; पण पोलिसांनी दखल घेतली नाही. सदर घटनेतील आरोपींना पोलीस प्रशासन पाठीशी घालत असल्याचा आरोप पाठक कुटुंबीयांनी केला आहे. १४ दिवस लोटूनही पोलीस प्रशासनाने कारवाई न केल्याने असंतोष पसरला आहे. गावात अनुचित घटना घडली तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वरिष्ठांनी लक्ष देत कारवाई करावी व भरपाई द्यावी, अशी मागणी पाठक कुटुंबियांनी केली आहे.(वार्ताहर)