शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून दहावीची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 05:00 IST

परीक्षा काळात गैरप्रकार होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार उपाययोजना करण्यात येत आहे. कॉपीमुक्त परीक्षा राबविण्यासाठी प्रत्येक तालुक्यात भरारी पथक तयार करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे७५ केंद्र सज्ज : १९ हजार ८६५ परीक्षार्थी प्रवेशित

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. शिक्षण विभागाने परीक्षेची तयारी पूर्ण केली असून दहावीच्या परीक्षेकरिता जिल्ह्यातील आठही तालुक्यात एकूण ७५ परीक्षा केंद्र सज्ज आहे. या परीक्षा केंद्रावरुन १९ हजार ८६५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.परीक्षा काळात गैरप्रकार होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार उपाययोजना करण्यात येत आहे. कॉपीमुक्त परीक्षा राबविण्यासाठी प्रत्येक तालुक्यात भरारी पथक तयार करण्यात आले आहे.जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये यापूर्वी दहावीच्या परीक्षेदरम्यान ज्या केंद्रावर गैरप्रकार आढळून आला तेथे बैठे पथकाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षा केंद्र परिसरात पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात येणार असून परीक्षेचे चित्रिकरणही केले जाणार आहे. परीक्षा केंद्राच्या १०० मीटरपर्यंत कोणालाही फिरकता येणार नाही.सध्या बारावीची परीक्षा सुरु असून उद्यापासून दहावीचीही परीक्षा सुरु होत आहे. या दोन्ही परीक्षांची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागावर असल्याने शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांच्या नेतृत्वात यंत्रणा सज्ज झाली आहे. एकूणच कॉपीमुक्त परीक्षा व्हावी यासाठी प्रयत्न होणार असून विद्यार्थ्यांनीही वेळेच्या एक तासापूर्वी परीक्षा केंद्रावर पोहोचणे गरजेचे आहे.विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता, दडपणहीशालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांकरिता व त्यांच्या पालकांना दहावीची परीक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. दहावीच्या परीक्षेच्या निमित्ताने पहिल्यांदाच विद्यार्थी शाळेबाहेरील परीक्षा केंद्रावर सर्व पेपर देण्यासाठी जात असल्याने विद्यार्थ्यांच्या मनात परीक्षेसंदर्भात उत्सुकता आणि तितकेच दडपणही आहे. वर्षभरापासून परीक्षेची तयारी केली असताना आता तीन तासाच्या परीक्षेत कितपण यश मिळते. यावरच परीक्षेचा निकाल ठरणार आहे.सात भरारी पथकांची करडी नजरजिल्ह्यात कॉपीमुक्त परीक्षा व्हावी याकरिता सात भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये शिक्षणाधिकारी माध्यमिक, शिक्षणाधिकारी निरंतर शिक्षण, विशेष महिला भरारी पथक, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक, उपशिक्षणाधिकारी प्राथमिक व प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या पथकाचा समावेश असून हे सातही पथक जिल्ह्यातील शाळांवर वॉच ठेवणार आहे. यासह तालुका पातळीवरही पथक नियुक्त करण्यात आले आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी