शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

परवान्यासाठी आरटीओ कार्यालयात नागरिकांची झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 05:00 IST

प्रशासकीय भवनात १० ते १५ विविध शासकीय कार्यालये आहेत. या कार्यालयांमध्ये शहरातूनच नव्हेतर जिल्ह्यातील विविध गावांतून नागरिक कामानिमित्त येतात. मात्र, प्रवेशद्वारावर कुठल्याही प्रकारची सुरक्षेच्या दृष्टीकोनातून उपाययोजना करण्यात आलेले नसल्याचे चित्र आहे. शुक्रवारी उपप्रादेशिक कार्यालयात वाहनांचा परवाना आणि परवान्यासाठी परीक्षा देण्यासाठी मोठी गर्दी दिसून आली. यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

ठळक मुद्देसोशल डिस्टन्सिंगचा उडाला फज्जा : ना सॅनिटायझर, ना थर्मल गन, उपाययोजनांकडे दुर्लक्ष

  लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथील प्रशासकीय भवनात विविध शासकीय कार्यालयांत नागरिक येतात. त्यामुळे या कार्यालयात मोठी गर्दी असते. तळमजल्यावर असलेल्या आरटीओ कार्यालयाच्या आवारात वाहनांच्या परवान्यासाठी मोठी झुंबड उसळली होती. अनेकजण विनामास्क मुक्तसंचार करताना दिसले तर सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचे दिसून आले. त्यामुळे कोरोनाचा फैलाव होण्याचा धोका निर्माण झाला आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देत योग्य उपाययोजना राबविण्याची मागणी करण्यात येत आहे. प्रशासकीय भवनात १० ते १५ विविध शासकीय कार्यालये आहेत. या कार्यालयांमध्ये शहरातूनच नव्हेतर जिल्ह्यातील विविध गावांतून नागरिक कामानिमित्त येतात. मात्र, प्रवेशद्वारावर कुठल्याही प्रकारची सुरक्षेच्या दृष्टीकोनातून उपाययोजना करण्यात आलेले नसल्याचे चित्र आहे. शुक्रवारी उपप्रादेशिक कार्यालयात वाहनांचा परवाना आणि परवान्यासाठी परीक्षा देण्यासाठी मोठी गर्दी दिसून आली. यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. अनेक बाकांवर नागरिक विनामास्क बसून असलेले दिसून आले. तर अनेकांनी प्रवेशद्वारासमोरील हॉलमध्ये गर्दी केल्याचे दिसून आले. मात्र, याकडे कुणाचेही लक्ष नसून ही बाब कोरोनाला आमंत्रण देणारी ठरत आहे. त्यामुळे याकडे लक्ष देत योग्य उपाययोजना राबविण्याची मागणी करण्यात येत आहे.  

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका दिवाळीपूर्वी कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत काही अंशी घट झाली होती. मात्र, दिवाळीनंतर पुन्हा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येचा  आलेखात चढ-उतार आहे. मात्र, प्रशासकीय भवनात उसळणाऱ्या गर्दीमुळे पुन्हा कोरोनाची लाट उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 

सॅनिटायझर, थर्मल गन अजूनही बेपत्ताचकोरानाचा वाढता फैलाव बघता प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर सॅनिटायझर आणि तामपान मोजण्यासाठी थर्मलगन असणे आवश्यक आहे. तसेच प्रवेशद्वारासमोरच सॅनिटायझर ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, प्रशासकीय भवनात येणाऱे सर्रास नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत असून सॅनिटायझर आणि थर्मलगन बेपत्ता झाल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसcorona virusकोरोना वायरस बातम्या