आयुर्वेदिक औषधांच्या नावावर नागरिकांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 06:00 AM2020-01-16T06:00:00+5:302020-01-16T06:00:10+5:30

वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही पदवी नसताना असे अनेक भोंदू वैद्य सर्दी खोकल्यापासून मधुमेहापर्यंत हमखास इलाज करण्याचा दावा करताना दिसतात. गावठी औषधांचा हा व्यवसाय रस्त्यावर राजरोसपणे सुरू आहे. आयुर्वेदिक औषधांमुळे आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. त्यामुळे याचा फायदा घेऊन हे भोंदू वैद्य नागरिकांकडून पैसे उकळून त्यांची फसवणूक करतात.

Citizens cheat in the name of Ayurvedic medicines | आयुर्वेदिक औषधांच्या नावावर नागरिकांची फसवणूक

आयुर्वेदिक औषधांच्या नावावर नागरिकांची फसवणूक

googlenewsNext
ठळक मुद्देशहरात जागोजागी दुकाने : चढ्या दराने केली जाते विक्री

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोणत्याही आजारातून लवकर बरे होण्याचे औषध मिळाले तर ते प्रत्येकालाच हवे असते. या औषधांनी आजार तर बरा होतो. परंतु, त्याचे शरीरावर दुष्परिणाम होतात. त्यामुळे बऱ्याचदा रूग्णास साईड इफेक्टची भीती नसलेल्या आयुर्वेदीक औषधांचा आधार घेतात. वर्धा शहरात रस्त्यावर गाड्या उभ्या करून किंवा तंबू ठोकून औषधी वनस्पतींपासून औषधे बनविण्याचे सांगून नागरिकांची सर्रास लूट करणाºया भोंदू वैद्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही पदवी नसताना असे अनेक भोंदू वैद्य सर्दी खोकल्यापासून मधुमेहापर्यंत हमखास इलाज करण्याचा दावा करताना दिसतात. गावठी औषधांचा हा व्यवसाय रस्त्यावर राजरोसपणे सुरू आहे. आयुर्वेदिक औषधांमुळे आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. त्यामुळे याचा फायदा घेऊन हे भोंदू वैद्य नागरिकांकडून पैसे उकळून त्यांची फसवणूक करतात. या औषधांच्या आहारी जाणाऱ्यांमध्ये गुप्तरोग आणि लैंगिक समस्यांनी त्रस्त असणाºया रुग्णांचे प्रमाण अधिक आहे.
आयुर्वेदिक औषधांची विक्री करणारे हे विक्रेते बहुतेक करुन हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश व उत्तर प्रदेश मधील आहे. हे वैद्य जंगलातून किंवा आदिवासींकडून औषधी वनस्पती आणून त्यांच्यापासून औषधे तयार करत असल्याचे सांगतात. चंद्रपूर, राजस्थान, हिमाचल प्रदेश, ठाणे, कर्जत, बदलापूर या आदिवासी भागातून औषधीवनस्पती मिळत असल्याचे काही विक्रेत्यांनी सांगितले.

प्रत्येकाचे जीवन हे मौल्यवान आहे. त्यामुळे कुठल्याही आजारावर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊनच उपचार करावा. जेणेकरून फसवणूक होणार नाही. इतकेच नव्हे तर उपचारही योग्यरित्या होतात. आयुर्वेदीक औषधांची दुकाने थाटणाºयांची पोलिसांनी परवाने तपासण्याची गरज आहे. बनावटी व्यक्तीवर कारवाईची गरज आहे.
- डॉ. पुरुषोत्तम मडावी,
जिल्हा शल्य चिकित्सक
वर्धा.

जर त्या विक्रेत्यांकडे औषधी विकण्याचे परवाने असेल तर ते औषधी विकू शकतात. पण, औषधी स्वत: तयार करून नागरिकांना विकत असेल तर अशांवर कारवाई केली जाईल.
- शहनाज ताजी, औषध निरीक्षक, अन्न व औषधी प्रशासन, वर्धा.

Web Title: Citizens cheat in the name of Ayurvedic medicines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.