शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांनीच तोडले गतिरोधक

By admin | Updated: September 23, 2016 02:29 IST

शहरातील बहुतांश भागांत नागरिकांनी स्वत:च मनमर्जी गतिरोधक निर्माण केले आहेत.

प्रशासनाचे होते दुर्लक्ष : शहरातील अन्य भागांतही डोकेदुखीवर्धा : शहरातील बहुतांश भागांत नागरिकांनी स्वत:च मनमर्जी गतिरोधक निर्माण केले आहेत. हे गतिरोधक वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत घातक ठरत होते. याबाबत तक्रारी करूनही उपयोग झाला नाही. अखेर शाक्य नगरातील संतप्त नागरिकांनी स्वत:च गतिरोधक खणून काढले. यामुळे वाहतुकीचा मार्ग प्रशस्त झाला आहे. वर्धा-यवतमाळ रस्त्यालगत असलेल्या देवळी नाक्याजवळील सिंदी कॉलनी परिसरात प्रत्येक रस्त्यावर बेकायदेशीर गतिरोधक निर्माण करण्यात आले होते. याबाबत अनेकदा वर्धा नगर पालिकेला तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने देण्यात आलीत. या भागातील नगर सेवक रमन लालवानी यांच्याकडेही वारंवार तक्रारी केल्या; पण कुणीही कार्यवाही केली नाही. परिणामी, नागरिकांना ये-जा करताना प्रचंड यातना सहन कराव्या लागत होत्या. याबाबत वारंवार तक्रारी करूनही अनधिकृतरित्या बांधलेले गतिरोधक तोडण्यात आले नाही. उलट गतिरोधकांच्या संख्येत वाढ झाली. या परिसरात एकूण ६१ अनधिकृत गतिरोधक आहेत. यापैकी काही गतिरोधक इतके उंच आहेत की, वाहनाने ये-जा करणाऱ्या नागरिकांना मानेचे आणि कंबरेचे आजार जडू लागले आहेत. गतिरोधकामुळे झटके लागत असल्याने वृद्ध आणि महिलांना वाहने चालविणे कठीण झाले. सदर अनधिकृत गतिरोधक तोडण्याबाबत पहिले निवेदन ५ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी, न.प. मुख्याधिकारी, न.प. अध्यक्षांना दिले. मुख्याधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यवाही करू, अशी ग्वाही दिली; पण कार्यवाही केली नाही. नगरसेवक रमन लालवानी यांनी, वाहनांचा वेग कमी व्हावा म्हणून बांधण्यात आले आहे, असे सांगितले. वास्तविक, रस्त्यावरून घरांमध्ये नळ जोडणी घेण्यात आली. पाईपला वाहनांमुळे नुकसान होऊ नये म्हणून परवानगी न घेता गतिरोधक बांधले. सात महिने कार्यवाही न झाल्याने शाक्यनगरच्या नागरिकांनी रविवारी काही गतिरोधक तोडले. आणखी अनधिकृत गतिरोधक कायम आहे. या उपक्रमात संजय जवादे, सिद्धार्थ आवळे, नाना बागडे, कुलदीप बनोदे, गौतम तुपसौंदर्य, अवी बन्सोड, दशरथ मोहिते, प्रमोद माहोरे, राजू मोडक, अमोल पाटील, संजय जंगले, सोहनिल तडसे, भीमराव कोसारे, निखील केसार आदींनी सहभाग घेतला.(कार्यालय प्रतिनिधी)