शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

व्हॅक्सिन घेण्यात ४५ ते ६० वयोगटांतील नागरिक आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 05:00 IST

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून महालसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. अवघ्या काही महिन्यांतच जिल्ह्यात लसीकरण मोहिमेने २.१५ लाखांचा उंबरठा ओलांडला आहे. लस तुटवड्यामुळे सध्या १८ ते ४४ वयोगटांतील लाभार्थ्यांना कोरोनाची प्रतिबंधात्मक लस देणे बंद असले तरी मुबलक लससाठा मिळताच याही वयोगटांतील लाभार्थ्यांना कोविडची व्हॅक्सिन दिली जाणार आहे.

ठळक मुद्देकठोर निर्बंध; १७ दिवसांतील स्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोविडचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी जिल्ह्यात ८ मेपासून जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू केले आहेत. याच कठोर निर्बंधाच्या १७ दिवसांत १९ हजार ६३१ लाभार्थ्यांनी लसीचा पहिला तर १२ हजार ६०३ व्यक्तींनी लसीचा दुसरा डोस घेतला असून त्यात सर्वाधिक लाभार्थी ४५ ते ६० वयोगटांतील आहेत, तशी नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे.जिल्ह्यात १६ जानेवारीपासून महालसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. अवघ्या काही महिन्यांतच जिल्ह्यात लसीकरण मोहिमेने २.१५ लाखांचा उंबरठा ओलांडला आहे. लस तुटवड्यामुळे सध्या १८ ते ४४ वयोगटांतील लाभार्थ्यांना कोरोनाची प्रतिबंधात्मक लस देणे बंद असले तरी मुबलक लससाठा मिळताच याही वयोगटांतील लाभार्थ्यांना कोविडची व्हॅक्सिन दिली जाणार आहे. ८ ते २४ मे या कालावधीत १७२ हेल्थकेअर वर्कस, ८६२ फ्रन्टलाईन वर्कस, १८ ते ४४ वयोगटांतील ३ हजार ४७९, ४५ ते ६० वयोगटातील १० हजार ३४८ तर ६० पेक्षा जास्त वयोगटांतील ४ हजार ७७० लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे तसेच २०३ हेल्थकेअर वर्कस, ८०४ फ्रंटलाईन वर्कस, ४५ ते ६० वयोगटांतील ६ हजार ५९३ तर ६० पेक्षा जास्त वयोगटांतील ५ हजार ३ लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला. एकूणच कठोर निर्बंधाच्या १७ दिवसांत कोविडची लस घेण्यात ४५ ते ६० वयोगटांतील लाभार्थीच पुढे असल्याचे आकडवारीवरून स्पष्ट होते. मात्र, लसीअभावी अजूनही अनेकांना लसीकरणाची प्रतीक्षा असून लस उपलब्ध करण्याची मागणी होत आहे.

जिल्ह्यात कोविशिल्डचे १८ हजार डोसnकोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन ही लस सध्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांना दिली जात आहे. सध्या जिल्ह्यातील कोव्हॅक्सिन लस संपली असली तरी कोविशिल्डचे सुमारे १८ हजार डोस जिल्ह्यात असल्याने तसेच ४५ पेक्षा जास्त वयोगटांतील लाभार्थ्यांना कोरोनाचा प्रतिबंधात्मक लस दिली जात असल्याने नागरिकांनीही नजीकच्या केंद्रावर जावून लसीकरण करून घेतले पाहिजे.

लाभार्थ्यांना देण्यात येणारी लस पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी लसीबाबत कुठलीही भीती मनात बाळगू नये. कोविड मृत्यू रोखण्यासाठी लस उपयुक्त असल्याने नजीकच्या लसीकरण केंद्रांवर जावून नागरिकांनी लस घ्यावी.- डॉ. प्रभाकर नाईक,

अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस