शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
3
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
4
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
8
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
9
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
10
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
12
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
13
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
14
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
15
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
16
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
17
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
18
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
20
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
Daily Top 2Weekly Top 5

आगीत तुरीच्या गंजीचा कोळसा

By admin | Updated: February 26, 2017 00:51 IST

येथील शेतकऱ्याने तुरीची कापणी करून त्या वाळविण्याकरिता एक गंजी करून शेतात ठेवली होती.

चार लाखांचे नुकसान : आगीचे कारण गुलदस्त्यात विजयगोपाल : येथील शेतकऱ्याने तुरीची कापणी करून त्या वाळविण्याकरिता एक गंजी करून शेतात ठेवली होती. या गंजीला शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत वाळण्याकरिता ठेवलेल्या तुरीचा कोळसा झाला. या आगीचे कारण मात्र कळू शकले नाही. यात शेतकऱ्याचे ४ लाख रुपयांचे नुकसान झाले. येथील शेतकरी प्रशांत मधुकर नानोटी यांची विजयगोपाल येथे शेती आहे. त्यांच्या शेतीचे दोन भाग असून यात एक पाच एकर आणि दुसरा १० एकर असे दोन पट्टे आहे. याव्यतिरिक्त काही जमीन ते दरवर्षी मक्त्याने करतात. या जमिनीत त्यांनी यंदा कपाशी व तूर असे पीक घेतले होते. त्यांनी शेतातील संपूर्ण तूर कापल्यानंतर गावाजवळील एका शेतात दोन्ही शेतातील कापलेल्या तुरीची गंजी मारून ठेवली. या गंजीत सुमारे ९०० पेट्या असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या ९०० पेट्यांतून त्यांना ६० ते ७० क्विंटल तुरीचे उत्पादन होईल अशी अपेक्षा होती. पण आज दुपारी त्यांच्या शेतात असलेल्या तुरीच्या गंजीला आग लागली. याची माहिती मिळण्यापूर्वी गंजीतील तुरीचे पीक जळून खाक झाले. यात नानोटी यांना सुमारे ४ लाखांचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वर्षभर कष्टकरुन हाती आलेले पीक क्षणात नष्ट झाल्याने आधिच संकटात असलेला शेतकरी अडचणित सापडला आहे. या नुकसानीची शासनाकडून मदतीची मागणी होत आहे. तलाठी तामगाडगे यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अहवाल देवळी तहसीलदारांकडे पाठविला आहे.(वार्ताहर)