शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्याने शेतकऱ्याला दिलेला धनादेश अनादरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 06:00 IST

या हंगामात अनेक व्यापाऱ्यांच्या सहभागातून देवळीच्या धान्य मार्केटने चांगली उसळी घेतली आहे. याठिकाणी हजारो क्विंटल सोयाबीन व इतर शेतमालाच्या खरेदी विक्रीचे व्यवहार होऊन बऱ्यापैकी भावही दिले जात आहे. परंतु काही व्यापाऱ्यानी याचा गैरफायदा उचलण्याचाही प्रकार चालविण्याचे या घटनेवरुन निदर्शनास आले आहे. येथील धान्य परवानाधारक व्यापारी चित्रा सुरेंद्र जावंधिया यांच्या नावे भिमराव शिवाजी राऊत रा. पुलगाव या शेतकऱ्याचे २८.५० क्विंटल सोयाबीन लिलाव पद्धतीने खरेदी करण्यात आले.

ठळक मुद्देजाणीवपूर्वक केली चुकीची स्वाक्षरी : शेतकऱ्याची बाजार समितीच्या सभापतींकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : शेतकऱ्याने विकलेल्या सोयाबीनच्या मोबदल्यात धान्य परवानाधारक व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याला १ लाखाचा धनादेश देण्यात आला. त्या धनादेशावर व्यापाऱ्याने चुकीची स्वाक्षरी केल्याने बँकेत तो धनादेश वटलाच नाही. त्यामुळे व्यापाऱ्याने जाणीवपूर्वक चुकीची स्वाक्षरी करुन वेळ मारुन नेण्याचा प्रकार चालविला आरोप शेतकऱ्याने केला असून यासंदर्भात शेतकऱ्याने पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोहर खडसे यांच्याकडे तक्रार केली आहे.या हंगामात अनेक व्यापाऱ्यांच्या सहभागातून देवळीच्या धान्य मार्केटने चांगली उसळी घेतली आहे. याठिकाणी हजारो क्विंटल सोयाबीन व इतर शेतमालाच्या खरेदी विक्रीचे व्यवहार होऊन बऱ्यापैकी भावही दिले जात आहे. परंतु काही व्यापाऱ्यानी याचा गैरफायदा उचलण्याचाही प्रकार चालविण्याचे या घटनेवरुन निदर्शनास आले आहे. येथील धान्य परवानाधारक व्यापारी चित्रा सुरेंद्र जावंधिया यांच्या नावे भिमराव शिवाजी राऊत रा. पुलगाव या शेतकऱ्याचे २८.५० क्विंटल सोयाबीन लिलाव पद्धतीने खरेदी करण्यात आले. प्रतिक्विंटल ३ हजार ७०५ रूपये या दराप्रमाणे भिमराव राऊत यांना व्यापाऱ्याकडून १ लाख ३ हजार ६७८ रूपये घ्यावयाचे होते. त्यामुळे या व्यापाऱ्याने ३ हजार ६७८ रूपये रोख देऊन २३ नोव्हेंबरला उर्वरीत एक लाखाचा धनादेश दिला. हा धनादेश शेतकऱ्यांने बँकेत जमा केला असता तो वटला नसल्याने परत टपाली शेतकऱ्याला पाठविण्यात आला. त्यामध्ये धनादेशावरील व्यापाऱ्याची स्वाक्षरी चुकल्याचे कारण देण्यात आले.बाजार समितीने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे हा धनादेश २४ तासाच्या आत वटून शेतकऱ्याला पैसे मिळणे बंधनकारक होते. परंतु अद्याप धनादेशही वटला नाही व व्यापाऱ्याने शेतकऱ्याला पैसेही दिले नाही. त्यामुळे व्यापाऱ्याकडून हा प्रकार जाणीवपूर्वक केला असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्याने सभापती मनोहर खडसे यांच्याकडे केली आहे.येथील परवानाधारक व्यापारी चित्रा सुरेंद्र जावंधिया यांनी शेतकरी भीमराव राऊत यांना दिलेला एक लाख रुपयाचा धनादेश वटला नाही. यासंदर्भात शेतकऱ्यांने तक्रार केल्यानंतर व्यापाऱ्याला बोलाविण्यात आले. शेतकऱ्यांच्या या रक्कमेवर साडेबारा टक्के व्याजदराने शुक्रवारी रक्कम देण्याचे आश्वासन व्यापाऱ्याने दिले आहे.- मनोहर खडसे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुलगाव.

टॅग्स :Farmerशेतकरी