शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
5
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
6
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
7
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
12
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
13
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
14
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
15
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
16
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
17
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
18
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
19
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
20
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

कोर्‍या मुद्रांकाचा गैरवापर करुन केली फसवणूक

By admin | Updated: June 6, 2014 00:09 IST

सावकाराकडून कर्ज घेताना कोर्‍या मुद्रांकावर दिलेल्या सहीचा दुरुपयोग करीत शेतकर्‍याची फसवणुक केली. सावकाराने शेतकर्‍याच्या स्थावर मालमत्तेवर अधिकार दाखवत त्याची मालमत्ता परस्पर हडपण्याचा

वर्धा : सावकाराकडून कर्ज घेताना कोर्‍या मुद्रांकावर दिलेल्या सहीचा दुरुपयोग करीत शेतकर्‍याची फसवणुक केली. सावकाराने शेतकर्‍याच्या स्थावर मालमत्तेवर अधिकार दाखवत त्याची मालमत्ता परस्पर हडपण्याचा प्रयत्न सावकाराकडून होत आहे. याविरोधात शेतकर्‍याने प्रशासनाकडे तक्रार दाखल करीत न्यायाची मागणी केली आहे.सहाय्यक निबंधकाकडे शेतकरी शंकर बोरकर यांनी तक्रार करुन न्यायाची मागणी केली आहे. या निवेदनानुसार गजानननगर पिपरी(मेघे) येथील शंकर नारायण बोरकर यांनी सुकळी(स्टे.) येथील मेघश्याम नत्थूजी जाधव यांच्याकडून १५ हजार रुपयाचे कर्ज घेतले होते. याकरिता ५ टक्के व्याजदर आकारण्यात आला होता. हा व्याजदर करताना बोरकर यांनी जाधवला २0 रुपयाच्या मुद्रांकावर सही दिली होती. यावेळी हा मुद्रांक कोरा होता. कालांतराने बोरकरने कर्जाने घेतलेली रक्कम व व्याज जाधवला परत केले. यानंतर व्यवहाराची प्रक्रीया पूर्ण झाली होती. मात्र जाधवने कागदपत्र वेळेवर परत सदर इसमाने दिलेल्या कोर्‍या मुद्रांकाचा गैरफायदा घेत त्याच्या स्थावर मालमत्तेवर हक्क दाखविला. तसेच घराची विक्री करण्यासाठी सौदाचिठ्ठी केली याची  माहिती बोरकर यांना मिळताच त्यांनी जाधवकडे याबाबत विचारणा केली. तसेच पैसे घेताना दिलेला मुद्रांकही परत मागितला. त्यावेळी जाधवने मुद्रांक परत करण्याकरिता नकार दिला. व्याजासहित मुद्दलालचीरक्कम परत केल्यानंतरही जाधवकडून बोरकरला पैशाकरिता वारंवार धमकावणी होत असत. या प्रकाराला कंटाळलेल्या बोरकर यांनी शासनाकडे न्यायाची मागणी केली. सावकाराकडे सततच्या हेलपाटा मारुन कंटाळलेल्या बोरकरने या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदींना पाठविलेला आहे. शासनाने सावकराच्या पाशातून जनतेची पिळवणूक थांबविण्यासाठी कायदा केला. या अंतर्गत बोरकर यांनी शासनाकडे न्यायाची मागणी केली आहे.(स्थानिक प्रतिनिधी)